पाणी देयके स्वीकृती केंद्रांमार्फत भरण्याची सुविधा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 08, 2020
- 492
नवी मुंबई ः सिडकोच्या नळ जोडणीधारकांच्या विनंतीनुसार आता ऑनलाइनप्रमाणेच देयक स्वीकृती केंद्रांमार्फत (बिल कलेक्शन सेंटर) पाणी देयक भरण्याची सुविधाही सिडकोतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध नोडमधील पाणी देयक स्वीकृती केंद्रे सुरू करण्यात आली असून, या केंद्रांवर जाऊन ग्राहक आपले देयक रोख रक्कम, धनादेश (चेक), धनाकर्ष (डीमांड ड्राफ्ट) या स्वरूपात भरू शकतील. तसेच देयक भरल्याची पावतही सदर केंद्रांवर प्राप्त करून घेता येईल.
देयके संबंधित नोडनुसार पुढे दिलेल्या केंद्रांवर भरावीत
खारघर - सिडको कार्यालय, खारघर;
कळंबोली/नावडे/तळोजा - सिडको कार्यालय, कळंबोली;
कामोठे - पाणी पुरवठा कार्यालय, सेक्टर-6अ, कामोठे;
पनवेल (पूर्व)/करंजाडे/काळुंद्रे - सिडको कार्यालय, पनवेल;
पनवेल (पश्चिम) - सेक्टर-12, पाण्याची टाकी, पनवेल;
द्रोणागिरी - सिडको कार्यालय, द्रोणागिरी;
उलवे - सिडको कार्यालय, उलवे;
हेटवणे/सीबीडी सेक्टर-21/22 - रायगड भवन, सीबीडी
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai