नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आ. मंदाताईंचा मदतीचा हात
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 22, 2025
- 98
तुळजापुरमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या 350 किट्सचे वाटप
नवी मुंबई ः दिवाळीच्या तोंडावर राज्यातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातीत आलेले पीक मातीमोल झाले असून डोक्यावरचे छप्परही पावाने हिरावून घेतले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनासह विविध संस्था, व्यक्ती, यांच्याकडून मदतीचा हात मिळत आहे. नवी मुंबईतील आमदार मंदाताई म्हात्रे यांनीही सामाजिक बांधिलकी जपत तुळजापुर तालुक्यातील 300 हून अधिक शेतकऱ्यांना 6 ते 7 लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या 350 किट्सचे वाटप केले. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.
राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरीबांधव हवालदिल झाला असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरे, शेत, दुकाने यांचे नुकसान झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर बेघर होण्याची वेळ बळीराजावर आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करुन दिलासा दिला. त्याचप्रमाणे विविध पातळीवर गावकऱ्यांना सर्वोत्परी मदत केली जात आहे. विविध सामाजिक संस्था, दानशुर व्यक्ती, कलाकार, राजकीय नेते अशा अनेकांनी सढळ हाताने मदत देऊ केली आहे. यातच नवी मुंबईतील बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. आ. म्हात्रे यांनी गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून तालुका तुळजापुर, मौजे खडकी येथील शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. मंदाताई म्हात्रे यांच्या सहकार्याने सुमारे 6 ते 7 लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या 350 किट्स नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबांना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी तेथील व्यावसायिकांकडूनच 12 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करुन पाडव्याच्या मुहूर्तावर त्या वितरीत करण्यात आल्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने या गावात दिवाळीचा प्रकाश पडला आहे.
या मदतकार्याविषयी आ. मंदा म्हात्रे म्हणाल्या की, ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे, ग्रामस्थांचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाण्यासाठी मी खारीचा वाटा उचलला आहे. तेथील दुकानदारांनीही एका फोनवर वस्तू तात्काळ वितरीत करण्यास सहकार्य केले त्यामुळे हे शक्य झाले. प्रत्येकाने शेतकऱ्यांना जमेल तशी मदत करा. आपल्या एका मदतीने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येऊन त्यांचाही सण आनंदात जाईल असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai