‘कभी ना खत्म होता काम’ पथनाट्याचे आयोजन
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 16, 2025
- 64
नवी मुंबई : सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या प्रभावी नाट्यप्रयोगांसाठी प्रसिद्ध असलेल्या जन नाट्य मंच या प्रतिष्ठित नाट्य संस्थेचा नवीन नाट्य प्रयोग ‘कभी ना खत्म होता काम’ येत्या 17 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत सादर होणार आहे. हा प्रयोग सायं. 7 वाजता सीबीडी - बेलापूर, सेक्टर-8ए येथील कैराली हॉल येथे होणार आहे. प्रवेश सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आला आहे.
जन नाट्य मंच ही संस्था प्रसिद्ध रंगकर्मी सफदर हाशमी यांनी स्थापन केलेली असून, देशभरात सामाजिक भान निर्माण करणाऱ्या नाट्य प्रयोगांसाठी ओळखली जाते. कभी ना खत्म होता काम हे नाटक कामगार वर्ग, महिलांचे शोषण, आणि अखंड चालणाऱया श्रमजीवी संघर्षांवर प्रकाश टाकणारे आहे. आजच्या वेगवान शहरीकरणाच्या आणि असंघटित कामगारांच्या परिस्थितीत या नाट्य प्रयोगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या नाटकाच्या माध्यमातून समाजातील असमानता, महिला कामगारांचे हक्क, आणि श्रमिक वर्गाच्या समस्यांवर थेट व परिणामकारक संवाद साधण्याचा प्रयत्न जन नाट्य मंच करत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया डेमोक्रॅटिक विमेन्स असोसिएशन (एआयडीडब्ल्यूए) तसेच मुंबई-नवी मुंबई घर कामगार संघटना (सीआयटीयू) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमच्या आयोजनाची जबाबदारी टी. एन. हरिहरन, रेखा देशपांडे, आणि त्रिशिला कांबळे या पार पाडत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai