कोरोना पश्चात उपचारांसाठी अपोलोमध्ये ‘रिकव्हरी क्लिनिक’ सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 21, 2020
- 666
नवी मुंबई : नवी मुंबईतील ‘अपोलो हॉस्पिटल’ ने कोरोनाच्या आजारातून बर्या झालेल्या, परंतु अजूनही या आजाराचा काही प्रमाणात त्रास होत असलेल्या रुग्णांसाठी खास ‘रिकव्हरी क्लिनिक’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या आजारातून बर्या झालेल्या रुग्णांपैकी 40 टक्के जणांना गेले काही महिने श्वास लागणे, छातीत दुखणे, हृदयाविषयीच्या समस्या, सांधेदुखी, मेंदू व मज्जारज्जू यांच्या समस्या असे त्रास होत आहेत. अशा रुग्णांची दखल घेऊन त्यांना पुन्हा आरोग्य बहाल करण्यासाठी ‘रिकव्हरी क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. यामध्ये तज्ञांचे एक पथक नेमण्यात आले आहे.
कोरोना मधून बरे झालेले अनेक रूग्ण आमच्याशी संपर्क साधून काही लक्षणे सांगत आहेत. अशा रूग्णांना होणार्या त्रासांची दखल घेण्यासाठी व त्यांना उपचार मिळवून देण्यासाठी आम्ही रिकव्हरी क्लिनिक सुरू केल्याचे येथील डॉ. लक्ष्मण जेसानी (संसर्गजन्य - सल्लागार) यांनी सांगितले. कोविडनंतरच्या काळजीसाठीचे हे खास दवाखाने रूग्णांना आवश्यक ते विशिष्ट उपचार मिळवून देण्यासाठी मदत करतील. रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी आम्ही मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत आणि चिकित्सकांनाही प्रशिक्षण दिले आहे. ही क्लिनिक्स रुग्णांना कोरोनाच्या परिणामांपासून मुक्त होण्यास मदत करतील.
कोरोनामुळे शरीरातील जवळजवळ सर्व महत्वाच्या अवयवांवर परिणाम होतो. ‘स्ट्रोक’ आणि हृदयविकाराचा झटका या गंभीर घटनांव्यतिरिक्त, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखी तीव्र परिस्थिती उद्भवणे हे ‘कोविड’च्या आजाराचे दुष्परिणाम आहेत. कोविड होऊन गेल्यानंतरही अनेक रुग्ण अचानक मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे आणि त्यापैकी बहुतेकांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, असेही दिसून आले आहे.
नवी मुंबई म्हणाल्या, कोरोनाचे विषाणू हे केवळ फुफ्फुसांवरच नव्हे तर शरीरातील इतर अवयवांवरही हल्ले करतात आणि त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. कोविडचा तीव्र आजार नसलेल्या रुग्णांमध्येही ते बरे झाल्यानंतर विषाणूचे दुष्परिणाम बराच काळ राहतात. काहींच्या दीर्घकालीन समस्या गंभीरही होतात. विशेष ‘रिकव्हरी क्लिनिक’ मुळे रुग्णांच्या लक्षणांचे निरीक्षण करणे आणि त्यांना गरजेनुसार तातडीने उपचार देणे शक्य होणार असल्याचे डॉ. जयालक्ष्मी टी. के, सल्लागार -पल्मोनॉलॉजी यांनी सांगितले.
कोरोना ’मधून बरे झालेले व आता अनेक तक्रारी करणारे सुमारे 250 रुग्ण आमच्या बाह्य रुग्ण विभागामध्ये (ओपीडी) आहेत. येथे या रुग्णांमधील कोरोना पश्चात तीव्र लक्षणे वाढू नयेत, यासाठी विशेष काळजी घेण्यात येईल. ‘कोव्हॅलेसंट प्लाझमा’च्या चाचण्या व त्याचे दान हा उपक्रम नवी मुंबई महानगरपालिका ‘एनएमएमसी’ च्या सहकार्याने राबविण्याबरोबरच ‘अपोलो हॉस्पिटल’मध्ये रुग्ण-केंद्रित, सर्वसमावेशक, टेलिमेडिसिन पद्धतींनी सुद्धा कोरोनावर उपचार करण्यात येतात असे ‘अपोलो हॉस्पिटल्स’चे मुख्य कार्यान्वयीन अधिकारी व युनिटचे प्रमुख संतोष मराठे यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai