 
                                    		
                            शिरवणे शाळेत मातृभाषेचा जागर
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 22, 2020
- 781
नवी मुंबई, दिनांक 21,  (प्रतिनिधी), आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगर पालिका शाळा क्रमांक 15, शिरवणे शाळेत मातृभाषेचा जागर अशा एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी वक्त्यांची तर शिक्षकांनी श्रोत्यांची भूमिका बजाविली.       यावेळी बंगाली, भोजपुरी, पंजाबी, हरियाणवी, मराठी, उर्दू , गुजराथी, मारवाडी, आगरी, मालवणी, अहिराणी, बंजारी, वडार, खानदेशी, कोळी, कोकणी, मराठवाडी, नागपुरी, अशा मातृभाषेतून व बोलीभाषेतून विद्यार्थ्यांनी गप्पा, गाणी, म्हणी, नाटके, विनोद सादर केले. राहुल गावडे व ओमकार मुद्दे यांनी अनुक्रमे कोल्हापुरी व वडार  बोलीभाषेत सादर केलेली एक पात्री नाटके विशेष उल्लेखनीय ठरली. यावेळी कलाशिक्षक अमृत पाटील नेरुळकर यांनी या उपक्रमाची संकल्पना स्पष्ट करुन सादर केलेल्या आमी शाताव जावाचू तवा या आगरी बोलीतील कवितेने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. 
मातृभाषेचा जागर या परिसंवादात सर्वच विद्यार्थ्यांनी आपली रोखठोक मते मांडली. मातृभाषेतून शिकताना कोणतीही संकल्पना जेवढी सहज व लवकर स्पष्ट होते तेवढी स्पष्टता इतर कोणत्याही भाषेत नसते. म्हणूनच मातृभाषा हेच शिक्षणाचे सर्वात चांगले माध्यम असल्याचे मत शिक्षिका प्रणाली पिंपळे यांनी आपल्या बोलीभाषेतील भाषणातून व्यक्त केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी मातृभाषेतूनच शिक्षण घेण्याचा संकल्प केला.
मुख्याध्यापक सुनिल मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी विशेष मेहनत घेतली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
                                    
                            Stock Market by TradingView
                                
                             
                                 
                                     
                                                                     
                                                                     
                                                                     
                                             
                                             
                                                     
                                                     
                                                     
                                                    
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai