वीजबिल दरवाढ कमी होईपर्यंत संघर्ष चालू राहील...

पनवेलमधील मोर्चात मनसैनिकांचा निर्धार

पनवेल ः वाढीव वीजबिला विरोधात 26 नोव्हेंबरला मनसे ने संपुर्ण राज्यात मोर्चे आजोजित केेल आहेत. त्याच पार्श्‍वभुमीवर पनवेलमध्ये मनसेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते प्रांत कार्यालय असा धडक मोर्चा आयोजित केला होता. वीजबिल दरवाढ कमी होई पर्यंत आमचा संघर्ष चालू राहील असा निर्धार यावेळी मनसैनिकांनी व्यक्त केला.

वाढीव वीज बिलाच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून आता जनतेला न्याय देण्यासाठी संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चे आयोजित केले आहेत. आज संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येत आहे. मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच मनविसे रायगड जिल्हा अध्यक्ष अक्षय काशीद साहेब, जिल्हा सचिव केसरीनात पाटील पनवेल तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या मोर्चामध्ये जनतेची सर्वच समस्या निराकरण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली असुन शेवटपर्यंत वीजबिल दरवाढ कमी होई पर्यंत आमचा संघर्ष चालू राहील असा निर्धार करण्याक आला. तसेच आज मोर्चा आम्ही शांततेत काढलाय जर आमची मागणी मान्य झाली नाही , आज जसा आम्हाला  रोखण्यासाठी पोलीस छावणी लावली होती तीच पोलीस छावणी महाराष्ट्र वीजबिल कार्यालयाला लावावी लागेल असे जाहीर मत मनसे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी मांडले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष अक्षय काशीद, पनवेल तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ, पनवेल तालुका सचिव अमोल पाटील, वाहतूक सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रवीण दळवी, रायगड जिल्हा उप अध्यक्ष दीपक कांबळी, आदी पदाधीकारी आणि महिला आघाडी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.