कंटेनर हाताळणीत 7.61टक्क्यांची वाढ

 एकूण कार्गोमध्ये झाली9.04 टक्क्यांची वाढ

उरण : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) भारताचे अग्रणी कंटेनर पोर्ट आहे. जेएनपीटीने नोहेंबर महिन्यात 413,737 (टीईयू)कार्गोची हाताळणी केली असून गेल्या वर्षी याच महिन्यात केलेल्या कार्गो हाताळणीच्या तुलनेत 7.61 टक्क्यांची वाढ झाली आहे. लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्याने देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याने ही वाढ झाली आहे. 

जेएनपीटीमध्ये नोहेंबर महिन्यात कंटेनर सहित एकूण 5.70 दशलक्ष टन वाहतुकीची हाताळणी केली गेली जी मागील वर्षी याच महिन्यात हाताळणी केलेल्या 5.22 दशलक्ष टनांपेक्षा 9.04 अधिक आहे. नोहेंबर महिन्यात हाताळणी केलेल्या एकूण वाहतुकीमध्ये 0.59 दशलक्ष टन बल्क कार्गोचा समावेश आहे, मागील वर्षी याच महिन्यात 0.55 दशलक्ष टन बल्क कार्गोची हाताळणी केली गेली होती.

नोहेंबर महिन्यात रेल्वे गाड्यांच्या सरासरी मासिक टर्मिनल हाताळणी वेळेमध्ये सुधारणा होऊन ती आता 4.28 तास झाली आहे, ऑक्टोबर व सप्टेंबर महिन्यात ही वेळअनुक्रमे 4.48 व 6.18 तास इतकी होती. रेल्वे गाड्यांच्या फे-यांची सरासरी मासिक वेळ (ट्रेनच्या आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत) कमी होऊन नोहेंबर महिन्यात 9.08 तास झाली आहे,ऑक्टोबर व सप्टेंबर महिन्यात ही वेळअनुक्रमे 9.45 व 13.34 तास होती. जेएनपीटीमध्ये नव्याने सुरू झालेल्या सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझामध्ये नोहेंबरमहिन्यात 43,619ट्रॅक्टर ट्रेलर हाताळलेगेले ज्याद्वारे 68,909टीईयू कार्गोची वाहतुक झाली.