जेएनपीटीचा वीजवितरण फ्रॅन्चायझी करार
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 13, 2021
- 706
उरण : भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)ने आपल्या क्षेत्रात वीजपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) सोबत एक सामंजस्य करार करून वितरण फ्रॅन्चायझी करार केला आहे. जेएनपीटीच्या विश्वस्त मंडळाने 24 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत या संबंधीच्या प्रस्तावास मान्यता दिली होती.
या कराराद्वारे जेएनपीटी विद्युत अधिनियम 2003 चे पालन करून वीज वितरण फ्रॅन्चायझी करारावर स्वाक्षरी करणारे आणि वीज पुरवठ्यातील अडचणी सोडवणारे देशातील पहिले प्रमुख पोर्ट बनले.
जेएनपीटीमध्ये पाच कंटेनर टर्मिनल आहेत जे भारतातील प्रमुख बंदरांद्वारे हाताळणी केल्या जात असलेल्या एकूण कंटेनर कार्गोच्या 50 टक्क्यांहून अधिक कंटेनर कार्गोची हाताळणी करतात. जेएनपीटीने एनएसआयसीटी, बीएमसीटी आणि जीटीआयपीएलला सवलतीच्या कराराद्वारे 30 वर्षांच्या लीजवर जमीन दिली आहे आणि या सवलतीच्या कराराअंतर्गत संबंधित टर्मिनल्सना वीजपुरवठा करण्याची जबाबदारी जेएनपीटीची आहे. फ्रेंचायझी करारावर स्वाक्षरी करण्यासाठी महावितरणच्या अधिका-यांच्या सहकार्याने जेएनपीटीसाठी सरकारी / अर्धसरकारी नावाचा एक स्वतंत्र प्रवर्ग तयार केला गेला होता, ज्यात बंदरे, संरक्षण आणि एमआयडीसी इत्यादींचा समावेश असेल.
या करारा संदर्भात बोलताना जेएनपीटी चे अध्यक्ष संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले या करारामुळे वीजवितरणास कायदेशीर रूप देण्याची प्रक्रियापूर्ण झाली आहे आणिया करारामुळे जेएनपीटीला आपल्या भागधारकांप्रति आपली कर्तव्यपार पाडण्यास मदत होईल. हा करार होण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही महावितरणच्या टीमचे आभारी आहोत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai