मनसेचा नोकरी व व्यवसाय मेळावा

नवी मुंबई ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रेरणेने मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे नव उद्योजकांना प्रोत्साहित करणार्‍या तसेच तरुण तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार्‍या नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याचे गुरुवार 21 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता मनसे नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे. 

लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, व्यवसाय बुडाले. रोजगार बुडाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. राज्यावर आलेल्या आर्थिक संकटाला बळकटी देण्याकरिता राज ठाकरे यांचे वेळोवेळी होणार्‍या सूचनांचे पालन करत असताना रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे, मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, रोजगार व स्वयं रोजगार विभागाचे सरचिटणीस संजय लोणकर व चिटणीस सिद्धी आंगणे यांच्या संकल्पनेतून रोजगाराची संधी उपलब्ध करणे हि नैतिक जबाबदारी समजून साधारण एक महिन्यापासून मेळाव्यात सहभागी होणार्‍या तरुण-तरुणींची नोंदणी सुरू करण्यात आली. आतापर्यंत नवी मुंबई, ठाणे, पनवेल, मुंबई येथून जवळपास 500 पेक्षा अधिक तरुण -तरुणींनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. स्थानिक तरुण-तरुणींच्या मागणीप्रमाणे नोकर्‍यांचे वर्गीकरण करून मनसेचे शिष्टमंडळ नवी मुंबईच्या उद्योजकांना प्रामुख्याने DHL,Haffel,Mahindra Logistics,Tata AIG, Jaguar Perks अशा अनेक कंपन्या प्रत्यक्ष चर्चेअंती सदर मेळाव्यात सहभागी होणार आहेत. अनेक सामाजिक संस्था आठवी, दहावी व बारावीच्या मुलांना कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवीन नोकर्‍या उपलब्ध करून देणार आहेत. महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक बनविणे हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य असून त्यासाठी त्यांना अनेक महामंडळाची माहिती देण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात ज्यांचे उद्योग - व्यवसाय बुडाले तसेच ज्यांना नवीन व्यवसायाची संधी पाहिजे त्यांना अनेक छोट्या छोट्या उद्योजकांचे मॉडेल समोर ठेवून उदाहरणार्थ कात्रज दूध संपूर्ण भांडवल 5 लाख रुपये ज्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या तर्फे विनातारण व बिनव्याजी एकूण भांडवळच्या 60 टक्के रक्कम मिळवून देण्यात येत आहे. फिरते अन्नधान्य भाजीपाला केंद्र व फिरते खाद्य पदार्थ वाहन अतिशय कमी भांडवलामध्ये महामंडळाच्या सहाय्याने तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या सहाय्याने नवयुवकांना आकर्षित करण्यासाठी नवउद्योजकांना घडवण्याचा मानस रोजगार विभागाचा आहे. यासाठी मनसे पालक संघटनेचे सर्व पदाधिकारी व रोजगार विभागाचे पदाधिकारी प्रामुख्याने ठाणे उपजिल्हा संघटक भूषण कोळी, नवी मुंबई शहर संघटक सनप्रित तुर्मेकर, उपशहर संघटक अनिकेत पाटील, शिवम कवडे, आकाश पोतेकर, किरण काकेकर विभाग संघटक सागर विचारे सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत.