विक्रिसाठी आणलेले मांडूळ सापासह खवल्या मांजर हस्तगत
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 02, 2021
- 965
पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 ने केली तिघांना अटक
पनवेल ः मांडूळ सापासह खवल्या मांजराच्या विक्रीसाठी पनवेलमध्ये आलेल्या तिघांना पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 च्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 2 किलो वजनाचा मांडूळ साप व 17 किलो वजनाचे खवल्या मांजर हस्तगत करण्यात आले आहे.
पोलीस हवालदार अनिल पाटील यांना शेडुंग टोल नाक्याजवळ दोन इसम मांडूळ नावाचा साप वन्यजीव विक्रीकरिता घेऊन येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार पनवेल गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पथकाने सापळा रचून अजिज शेख (38) व संतोष मंडले (33) यांना ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे रोहिदास गायकवाड (24) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 17 किलो वजनाचे खवल्या मांजर जप्त करण्यात आले आहे. सदर वन्यजीव हे मोठ्या रक्कमेला विकणार ते होते. त्यासाठी ते ग्राहक शोधत असताना पनवेल गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शेखर पाटील, पोलीस उपायुक्त प्रवीण कुमार व सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश कराड, संदीप गायकवाड, शरद ढोले, पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे, सहायक फौजदार सुदाम पाटील, पोलीस हवालदार अनिल पाटील, सुनील साळुंखे, मधुकर गडगे, सचिन पवार, प्रमोद पाटील, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, राजेश बैकर, सचिन पाटील, पोलीस नाईक दपक डोंगरे, सुनील कुदळे, रुपेश पाटील, सचिन म्हात्रे, राहुल पवार, प्रफुल्ल मोरे, इंद्रजित कानू, पोलीस शिपाई संजय पाटील, प्रवीण भोपी आदींच्या पथकाने केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai