कामगारांच्या उन्नतीसाठी सदैव सहकार्य करणार
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 24, 2021
- 794
आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही; विस्तारित कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल : कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे ही आपली कायम भूमिका असते. त्यामुळे कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी व सदैव सहकार्य करीत राहणार, अशी ग्वाही भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. ऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या कामगार संघटनेच्या तळोजा एमआयडीसी येथील विस्तारित कार्यालयाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
रविवारी (दि. 21) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते तळोजा एमआयडीसी येथील विस्तारित कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, जीएसटी मुंबई विभाग आयुक्त राजेंद्र सरवदे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, वासुदेव घरत, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, संतोष भोईर, विष्णू जोशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी व सदैव सहकार्य करीत राहणार असल्याचे सांगितले. तसेच तळोजा एमआयडीसीत विविध प्रकारचे अनेक कारखाने आहेत. त्यामध्ये माथाडी, ट्रान्सपोर्ट, जनरल असे अनेक प्रकारचे कामगार गणले जातात. या सर्व कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीने नेतृत्वाची गरज लागते. मला नक्की खात्री आहे की नंदकुमार म्हात्रे त्या दृष्टिकोनातून त्यांना निश्चितपणे चांगले नेतृत्व देतील आणि त्यांना राजकुमार म्हात्रे व सहकारी कामगारांच्या उन्नतीसाठी ताकद देतील. या परिसरामध्ये कामगारांचे शोषण-पिळवणूक होऊ नये यासाठी ही संघटना काम करेल आणि त्याकरिता त्यांना लागेल ते सहकार्य आम्ही देऊ, अशी ग्वाहीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai