मैफील फिलिंग्सची (फ्रेंडशिपची दुनियादारी)

प्रत्येकाच्या आयुष्यात भरपूर अशा फीलिंग्स असतात. त्या आपल्याला रडायलाही लावतात, हसायलाही लावतात, आनंद व्यक्त करायला देखील लावतात अशाच सुंदर आठवणींचा खजाना मैफील फिलिंग्सची सदरात असणार आहे. खर तर मैफिल म्हंटलं तर आपल्याला गाण्यांची, संगीताची मैफिल आवर्जून आठवते पण फीलिंग्स म्हंटलं तर प्रत्येकाच्या मनातल्या भावना आणि त्यातून हृदयायला होणारा अलगद स्पर्श असतो.

फ्रेंडशिपची दुनियादारी

खरच प्रेमापेक्षाही न्यारी असते ही फ्रेंडशिपची दुनियादारी चला तर मग बघूयात मैफिल फीलिंग्सची या सदरातील भाग पहिला फ्रेंडशिपची दुनियादारी.

काहीही नात नसताना जे नात निर्माण होत ती म्हणजे मैत्री असते. प्रत्येकाच्या सुखात आणि दु:खात आपुलकीने एकत्र येणे याला मैत्री असे म्हणतात. खर तर कॉलेजात प्रवेश घेताना आपल्याला पहिला प्रश्न पडतो, तो म्हणजे आपल्याला चांगले मित्र भेटणार का ? आपण दैनदिनं आयुष्य जगत असताना दिवसभरात आपल्याला खूप मित्र भेटतात. पण या मित्रांपेक्षा कॉलेजातला मित्रांचा ग्रुप हा वेगळाच असतो. कॉलेज कट्ट्यावरची धम्माल, पप्पूचा कट्यावरचा चहा, संध्याकाळची पाणीपुरी यालाच कॉलेजातली दुनियादारी म्हणतात. हरिओमश्रेय बच्चन यांच्या शब्दात इतकच दोस्त साथ हो, तो रोणे मे भी शान है, दोस्त साथ ना हो तो मैफिल भी स्मशान है .. 

रोशन देखील बारावी उत्तीर्ण झाला आणि त्याच्या मनात देखील असेच असंख्य प्रश्न निर्माण होत गेले. मला चांगले मित्र भेटणार का ? खर तर कॉलेजचं एक वैशिष्ट असते नवीन मुलांनी अ‍ॅडमिशन घेतले की सीनियर मुलांचं नवीन मुलांवर रेगिंग चालू होते. तसेच काहीसे रोशनच्याही बाबतीत होणार होते. विजय म्हणजे कॉलेजचा दादा होता. रोशनला लहानपणापासून मित्र बनवायची प्रचंड आवड. रोशन कॉलेजात नवीन असल्यामुळे विजयने त्याच्यावर रेगिंग सुरू केली. रोशनला आणि विजयला खेळामध्ये खूप आवड होती. आणि क्रिकेट म्हंटले तर प्रत्येकाला आवड असतेच. कॉलेजमध्ये क्रिकेट या खेळाचे पूर्ण नियोजन हे विजयकडेच असायचे. काही दिवसात कॉलेजमध्ये राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रोशनला वाटत होत की या स्पर्धेत आपण सुद्धा सहभागी व्हावे पण विजय त्याला घ्यायला नकार करायचा. आणि शेवटी विजय ने त्याच्या मित्रांनांच निवडले. त्याच्या जवळच्या मित्राना त्याने संधी दिली. पण रोशनने त्याच्या टिम मधून फॉर्म नाही भरला आणि विरुद्ध टिम मधून फॉर्म भरला. तसेच रोशनची देखील कर्णधारपदी निवड झाली. एकीकडे रोशन आणि दुसरीकडे विजय या दोघांमध्ये अतिशय दमदार पद्धतीने सामना रंगणार होता. विजयची तीन वर्षापासून सलग चौथ्याही वर्षी कर्णधारपदी निवड झाली होती. इकडे रोशन पहिल्यांदा कर्णधार झाला होता. ठरल्याप्रमाणे काहीच दिवसात सामनाची तारीख जवळ आली. दोन संघामध्ये अतिशय मेहनतीने तयारी चालू होती. ठरल्याप्रमाणे रविवारी कॉलेजात सामना सुरु झाला. विजयच्या टिमकडून जोरदार फटकेबाजी तर रोशनच्या टिमची फलंदाजीला सुरवात झाली. पण  शेवटी 3 चेंडूत 10 रन लागत होते. आणि शेवटी रोशनच्या टिमला पराभव स्वीकारावा लागला. अस म्हणतात कधी कधी जे होत ते चांगल्यासाठीच होत म्हणून ही गोष्ट देखील त्यामुळेच घडली असावी...  

कालांतराने, रोशनने विजयला घरी बोलावले. दंगा मस्ती राडा रोशनला करायचा होता. पण करु शकत नव्हता. कारण मैत्री नाही ना आणि जो पर्यंत दिल दोस्ती दुनियादारी होत नाही तो पर्यंत मैत्रीचा आस्वादही घेता येत नाही. विजय घरी आल्यानंतर रोशनने पटकन विचारले, तू चहा घेणार की कॉफी, विजय पटकन म्हंटला कॉफी चालेल आणि रोशन किचनकडे गेला. त्यानंतर विजयची नजर एका वेगळ्या दृश्याकडे गेली ते म्हणजे रोशनच्या कपाटाकडे. त्यामध्ये वीस ते पंचवीस ट्रॉफी, 10 सर्टिफिकेट आणि काही सुवर्णपदक लावलेले होते. तेवढ्यात रोशन कॉफी घेऊन आला. विजयने साधासा प्रश्न विचारला तू तर स्पोर्ट्स चॅम्पियन आहेस, मग त्या दिवसांची मॅच का हरलास तेव्हा रोशनने उत्तर दिल, जर 2 तासांची मॅच हारून मला आयुष्यभरचा मित्र मिळत असेल तर मॅच हरायला काहीच हरकत नाही. तो क्षण विजयसाठी अविस्मरणीय होता. विजयला काहीवेळेसाठी काहीच समजत नव्हते. कधीकधी जिंकण्यापेक्षा हरण्याला जास्त महत्व असते. म्हणून कदाचित रोशनने तसे केले असावे, आणि आता त्यांच्या मैत्रीला तब्बल पंधरा वर्ष झाले, म्हणजे ती मॅच जर रोशन हरला नसता तर त्यांची मैत्री झालीच नसती. आता दोघही क्रिकेट चॅम्पियन आहेत. विजय आणि रोशन आता एकाच ग्लास मध्ये सॅटरडे नाईट करतात. त्यांची मैत्री अशीच जबरदस्त पद्धतीने रंगते आणि आपली मैत्री देखील अशीच काहीशी असते.  

खर तर मैत्री हे अस नात असते, ज्याला कधीच बंधन नसते. कुठलीही हक्काची जागा म्हंटली तर आपण मैत्रीलाच निवडतो. ज्याप्रमाणे घड्याळात तीन काटे असतात. तिघही काटे एकमेकांना जास्तवेळ भेटत जरी नसले तरी, सेकंदभरच्या भेटीसाठी तासभर फिरतात. आणि नकळत संदेश देउन निघून जातात. मैत्रीतही असच काहीसं असत. सतत भेटत जरी नसलो तरी दोघांमध्ये जीव गुंतलेला असतो. जीवनात दोनच मित्र कमवा एक म्हणजे श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दूसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल. मैत्री म्हणजे अस नात जे सहाव्या वर्षापासून ते साठाव्या वर्षापर्यत टिकते ना, ते खरे नाते असते. 

समुद्रातील लाटा झेलून जसा प्रवास करतो ‘शिप’
तुमची आमची अशीच राहू द्या ‘फ्रेंडशिप’
चला तर मग भेटूयात अश्याच नव्या कोर्‍या विषयासह पुढच्या भागात  

-प्रसाद भालचंद्र सोनवणे (अभिनेता / लेखक )