Breaking News
युगावतार भगवान श्री सत्य साई, झाले बहु, होतील बहु परंतु या सम हा |
श्री. सत्यसाई बाबांविषयी बोलायचे झाले तर त्यांना कोणती उपमा दयावी ती अपुरीच वाटते कारण त्यांच्या अवतार कार्याबल सर्व सामान्य जनतेने खऱ्या अर्थाने जाणले तर ‘ऐकावे ते नवलच‘ असे प्रशंसोद्गार त्यांच्या मुखातून बाहेर येतात. कोण होते हे ‘सत्य साई‘ आणि काय आहे त्यांची शिकवण व कार्य?
श्री. सत्यसाई बाबांनी ‘सत्यनारायण राजु या नावाने पुट्टपत (जि. सत्यसाई जिल्हा, आंध््रा प्रदेश) या लहानशा खेडयात इ.स. 1926 मध्ये अत्यंत गरीब घ्ारात जन्मास आल्यापासूनच त्यांनी दैवी चमत्कारास सुरुवात केली ती म्हणजे शेष नारायणचे रूप ध्ाारण करून जन्मलेल्या हया बाळाच्या डोक्यावर शेष नागाने आपला फणा ध्ारला होता हे त्यांची जन्मदात्री इश्वरआम्मा व शेजारील कित्येक लोकांनी ते पाहिले होते. वयाच्या 14 व्या वष त्यांनी घ्ाराच्या समोर पटांगणात शिडसाई बाबासारखे ऐटीत बसून “मी साई बाबा आहे“ असे जाहिरपणे सांगितले होते. नंतर वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत आपल्या भक्तांना त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी विविध्ा मार्गाने मार्गदर्शन केले. पुढे 40शी नंतर त्यांच्या अवतार कार्याने जोर घ्ोतला तो जनसामान्यांच्या मुलभूत गरजांना पुरे करण्यासाठी विविध्ा सेवा प्रकल्पांमध्ूान के.जी.ते पी.जी. पर्यंत मोफत शिक्षण पिण्याचे पाणी आणि स्वास्थ्यासाठी वैद्यकीय सुविध्ाा उपलब्ध्ा करून ‘बहुजन हिताय- बहुजन सुखाय व्रत आचरले. भगवान श्री. सत्य साईबाबांच्या अवतार मोहिमेचे सर्व काही वर्णन करणे म्हणजे टिटवीने अथांग सागरास रिता करणे अथवा मुंगीने सर्वव्यापी आकाशाला गवसणी घ्ाालण्याचा दुसाध्य प्रयत्न करणे होय. तथापि, न भुतो, ना भविष्यती अशा श्री सत्य साई अवताराबल जनसामान्यासाठी खालीलप्रमाणे सांगता येईल. त्यांनी समस्त जगतास उेशुन स्वत: आहीरपणे जे सांगितले ती एक जगाच्या आध्यात्मिक इतिहासातील एक महत्वपूर्ण घ्ाटना पुढीलप्रमाणे होय.
“मी कोणत्याही प्रचलित ध्ाार्मिक विचारप्रणाली / शिकवणीमध्ये अडथळा आणणे अथवा ती नष्ट करण्यासाठी अवतरलो नसून प्रत्येक जनमानसास त्याच्या अंगभूत जीवनप्रवासामध्ये अशा प्रकारे सुस्थिर करण्यासाठी आलो आहे की, ज्यायोगे ख्रिश्चन हा उत्तम खिश्चन, मुस्लिम हा उत्तम मुस्लिम व हिंदू हा उत्तम हिंदू बनेल परमेश्वरांपर्यंत पोहचण्याचा जो प्राचीन राजमार्ग आहे त्याची पुनर्बाध्ाणी करण्यासाठी मी आलो असून त्यामध्ये तुम्हा सर्वांना वेदाचा अर्क पाजण्याची अनमोल देणगी देवून पौराणिक सुज्ञानाचा वारसा लाभलेल्या सनातन ध्ार्माचे अबाध्ाितपणे जतन करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी विश्वातील समस्त भूमात्रांवर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी अवतार घ्ोतला आहे. म्हणूनच मी तुमच्यामध्ये एकदा दोनदा तीनदा नव्हेतर जितक्यांदा तुम्हाला माझी आवश्यकता भासेल तितक्यांदा मी तुम्हांसाठी ध्ाावत येण्यास मला आनंद वाटतो.
वाममार्गात अडकलेल्यांना सन्माग लावणे व सज्जनांचे रक्षण करणे यासाठी हा साई पुन्हा पुन्हा जन्म घ्ोईल. मी तुमच्या हृदयमंदिरात प्रेमदिप प्रज्वलित करून दिवसेंदिवस तो अध्ािक तेजाळत ठेवण्यासाठी आलो आहे. माझे अवतारकार्य कुठल्याही एका ठराविक कारणासाठी अथवा कोणा एका मतवादी पंथाच्या प्रसिद्धीचे नसून ते कोणत्याही तत्वप्रणाली साठी साध्ाकांना गोळा करणारे नाही. कोण्या साध्ाकांना अथवा भक्तगणांना माझ्या अथवा अमुक एका जथ्यामध्ये आकर्षित करण्याचा माझा मानस मुळीच नाही. मी तुम्हाला वैश्विक एकात्मतेच्या विचारप्रणालीचे बोध्ान करण्यासाठी आलो आहे. ही विचारप्रणाली म्हणजे एक दुस-यामध्ये प्रेमाचे आदान-प्रदान करून आनंद प्राप्त करण्याचा मार्ग होय, हा प्रेमाने कर्तव्य करण्याचा व प्रेमानेच जबाबदारी पार पाडण्याचा सुलभ मार्ग होय. विश्वास ठेवा की, सर्व मानवी हृदये एकाच देवाच्या ... पेने हेलावतात, सर्व मानवी मने एकाच देवाची आराध्ाना करतात. सर्व भाषामध्ाील सर्व नावाने ज्याचे सर्वजन स्मरण करतात व ज्या इंद्रियगोचर विविध्ा रूपांची सर्वजण पूजा करतात तो देव एकच आहे. त्या एकाच देवाची भक्ती/आराध्ाना/साध्ाना हृदयातील प्रेमानेच उत्तमपणे केली जाते. हा वैश्विक एकात्मतेचा प्रगल्भ दृष्टीकोन समस्त भूतलावरील सर्व कालखंडामध्ाील देशादेशातील मानव जातीमध्ाील विविध्ा जाती व पंथांच्या लोकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणला पाहिजे.
भगवान श्री सत्य साईबाबांची मोहिम संपूर्णपणे यशस्वी होण्यामध्ये त्यांच्या विविध्ा थरातील अगणित भक्त समूहांचा सिहांचा वाटा आहे. या अवतारकार्यात आर्थिक, बौद्धिक व साध्ानसंपत्ती इ.चे योगदान यासाठी त्यांची भक्तांवर सदैव ... पा होत असून शिक्षण, वैद्यकीय, सेवा व पाणीपुरवठा इ. चे कित्येक प्रकल्प फक्त भारतातील सर्व राज्यात नव्हे तर परदेशातही पूर्णत्वास गेले आहेत व त्यामध्ये सतत वाढ होत आहे. या प्रकल्पाद्वारे ज्या काही अगणित सुखसुविध्ाा निर्माण करून जनहितासाठी बहाल केल्या त्या सर्व विनामुल्य आहेत. ही वस्तुस्थिती असून सत्य बाब आहे. प्रि-प्रायमरी, सेकन्डरी अशा अनेक शाळा व महाविदयालये स्थापन केली आहेत. त्यातील विदयाथ म्हणजे भारत देशाचे भावी आदर्श नागरिक तर आहेतच या शिवाय भौतिक व भ्रामक जगास अज्ञान अंध्ाारातून ज्ञानप्रकाशाकडे नेणारे ते दूतही आहेत. श्री सत्य साईबाबांची पुट्टपत व बंगलोर (व्हाईट फिल्ड) सुपर स्पेशालिटी इस्पितळे म्हणजे गोरगरिबांना अदययावत (अल्ट्रामडर्न) मोफत वैदयकीय सेवेचे वरदानच होय. गरिबांसाठी घ्ारबांध्ाणी, 800 खेडयांना मोफत पाणी पुरवठा, हजारोंना दररोज अन्नदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्युझियम, स्पेस सेंटर, इंडोअर व हिल व्हिव्यु स्टेडिअम म्हणजे सत्य साई अवताराच्या आविष्काराची द्योतके होत. परमेश्वर साक्षात येथे नांदल्याच्या त्या पाऊलखुणा होत.
तुम्हांस गांभिर्याने नक्की काय सतावते? तुमचा तरतम भाव, तुमची दुखास घ्ाातलेली कवटाळणी, भेडसावणारी अतृप्त इच्छा आणि येण-केन प्रकारेन तुम्हाला हवे ते साध्य करण्याचा तुमचा मनसुबा इ. बाबी तुम्हास बेचैन करतात. मी तुमच्यासाठी सर्व काही करू शकतो परंतु त्यासाठी तुम्ही तुमच्या भौतिक गरजांपुत सारखे आध्यात्मिक क्षेत्रातील बाबींसाठीही जेव्हा माझ्याकडे वळाल, शांत बसाल व डोळे मिटुन मला म्हणाल: आता तुम्हीच माझ्या समस्येचा विचार करा. तुम्हाला सर्व काही मिळेल पण त्यासाठी तुमची प्रार्थना पूर्णत: माझ्यावरच अवलंबून राहून केलेली असली पाहिजे. तुम्ही फक्त दु:खात माझ्या मदतीसाठी जरूर प्रार्थना करता, परंतु तिचा ओघ्ा फक्त तुमच्या ईच्छापुतएवढाच मर्यादित असतो. तात्पर्य, तुम्ही पूर्णत: माझ्यावर विसंबून न राहता मला केवळ तुमच्या विनंतीशी तडजोड करण्याची आशा बाळगत असता. एखादया विचित्र रोग्याप्रमाणे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका जो स्वत:चा औषध्ाोपचार डक्टरानांच नेहमी सुचवत राहतो. तुम्ही तसे करू नका किंबहुना अतिदु:खद प्रसंगी असे म्हणा भगवंता, माझ्यावर गुदरलेल्या या प्रसंगाबल मी तुमची प्रशंसा करतो. तुम्हाला ध्ान्यवाद देतो की, ही प्रशंसा /प्रसंग माझीच गरज आहे. तुमच्या इच्छेनुसार माझ्या भौतिक व तात्पुरत्या जीवनमानासाठी लागणा-या बाबींची पुर्तता कराल, अशी मी तुम्हास प्रार्थना करतो. तुम्हीच जाणता की, माझ्या साठी काय योग्य आहे. एखादयावेळी तुम्हाला वाटते की, तुमच्या विनाशाचे प्रमाण कमी न होता वाढते आहे. तेव्हा रागाने तुमचा तोल ढळू देवू नका. अशा प्रसंगी तुमचे डोळे बंद करून मला विश्वासपूर्वक सांगा की, तुमच्या इच्छेप्रमाणेच ते होवू दया. तुम्हीच त्याच्याबल विचार करा. आणि जेव्हा तुम्ही असे बोलाल तेव्हा मी आवश्यकतेनुसार चमत्कार घ्ाडवून आणीन. मी फक्त अशाच प्रसंगांची वाट पहात असतो की, जेव्हा तुम्ही माझ्यावर पूर्णत: विश्वास ठेवत असता. मी सदैव तुमचाच विचार करतो पंरतु मी तेव्हाच मदत करू शकतो की, जेव्हा तुम्ही सर्वस्वी माझ्यावरच अवलंबून राहत असता.“
वरील शरणागतीचा संदेश म्हणजे भक्तांसाठी दैनंदिन जीवनातील त्यांची अतिउच्च पातळीवरील आध्यात्मिक साध्ाना होय खरोखर परमेश्वराच्या कृपावर्षावापेक्षा मोठी गोष्ट मनुष्याच्या जीवनात असचू शकत नाही. पुट्टपत येथील बाबांचा प्रशांतीनिलयम आश्रम म्हणजे जगाची आध्यात्मिक राजध्ाानीच होय. कारण प्रत्येक देशी, विदेशी भाविक-भक्त व सामान्य साध्ाक एका मळक्या नोटी प्रमाणे तेथे खेचला जातो व भगवान सत्यसाईबाबांच्या ... पेने एका नव्या को-या नोटीप्रमाणे शुद्ध होवून मायदेशी परततो. सत्य, ध्ार्म, शांती व प्रेमस्वरूप श्री सत्यसाईबाबा अठरा पुराणांचे सार ‘नेहमी मदत करा, कोणासही दुखवू नका या एकाच ओळीत सांगतात. तेथेच आध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी चढण्यास सुरुवात होते आणि प्रवासाअंती सदाचरणांतून जीवन मुक्तीचे शिखर गाठणे शक्य होते.
अध्ाात्म्य म्हणजे दुसरे आहे तरी काय? काया आणि मायाच्या पलिकडला प्रवास. हाच तरूणोपाय, त्यासाठी हवे सदाचरण श्री सत्यसाईबाबा जनसामान्यांसाठी महामानव झाले तर साध्ाकांसाठी व भक्तांसाठी अवतारी गुरु-परमेश्वर झाले. साध्ानेने आत्मशक्ती वृद्धिंगत करा‘ असे त्यांनी शिड अवतारात सांगितले तर ‘सर्वांची सेवा करा, सर्वांवर प्रेम करा“ चांगले पहा, चांगले करा, चांगले रहा असा सरळ सोपा संदेश त्यांनी त्यांच्या प्रवचनातून दिला आहे. भगवान श्री सत्य साईबाबांनी 24 एप्रिल 2011 रोजी महासमाध्ाी घ्ोतली. अवताराचे नियोजन दैवी असते. हा प्रचंड प्रपंच अखंडपणे चाालण्यासाठी त्यांची श्री. सत्य साई ट्रस्ट आणि श्री सत्य साई सेवा संघ्ाटना राज्य देश आंतरराष्ट्रीय पात्ाळीवर कार्यरत आहेत. ट्रस्ट हा विविध्ा विभागांचा कारभार पाहतो तर संघ्ाटना ही सेवक भक्तांद्वारे सेवेचे काम पाहते. मुंबईतील “ध्ार्मक्षेत्र (अंध्ोरी) व नवी मुंबईतील “साईप्रेम “ही श्री सत्यसाई ट्रस्ट व सत्यसाई सेवा संघ्ाटना (महाराष्ट्र, गोवा) ही प्रमुख कार्यालये आहेत. महाराष्ट्रात जिल्हा निहाय फिरत्या रूग्नवाहिका सर्व जिल्हयातील खेडुतांना विनामुल्य वैदयकीय उपचार करतात तो एक उल्लेखणीय सेवा प्रकल्प आहे. भारतातील विविध्ा राज्यांतून पुट्टपत प्रशांती सेवेसाठी आहे. हजारो सेवक संघ्ाटनेमार्फत पाठविले जातात. असे हजारो सेवेकरी पुट्टपत येथे दररोज सेवा करीत असतात. देशपातळी, राज्यपातळी, जिल्हा पातळी व समिती पातळीवरून सर्व कार्यक्रमांची नियोजन आयोजन व अमंलबजावणी करण्यात येते. सत्य साईबाबांच्या कोणत्याही मंदिरात/सेवाकेंद्रात कुठल्याही प्रकारचे दानपात्र अथवा हुंडी नसते. सर्व लहानमोठाा सेवा प्रकल्पांचा, कार्यक्रमांचा खर्च भक्तांमार्फत स्वेच्छेने दिलेल्या वर्गणीतून/डोनेशन द्वारा भागविला जातो. सालाबादप्रामणे श्री सत्य साई बाबांच्या या 99 व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जगभर विविध्ा पातळीवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पुट्टपत (आंध््राप्रदेश) ‘प्रशांती निलयम या भव्य आश्रमामध्ये अखिल भारतीय सत्यसाई सेवा संघ्ाटनेतील व सत्य साई विद्यापीठातील युवा वर्गातर्फे भगवान बाबांच्या जन्म दिनानिमित्त विविध्ा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुट्टपत येथे 23 नोव्हेंबर 2024 रोजी बाबांच्या भव्य सुर्वण रथाच्या मिरवणुकीचा सोहळा पार पडला. मुंबईतील ध्ार्मक्षेत्र (अंध्ोरी) व नवी मुंबईतील “साईप्रेम येथे 16 ते 24 नोव्हेंबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- पंढरीनाथ हराळ, जिल्हा सेवा समन्वयक, श्री सत्यसाई सेवा संघ्ाटना (म.प-1), नवी मुंबई
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai