राहण्यायोग्य शहरांमध्ये नवी मुंबई देशात सहावी तर राज्यात दुसरी

नवी मुंबई ः राहण्यायोग्य शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबईला देशात सहावा क्रमांक तर राज्यात दुसरा क्रमांक मिळाला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने 111 शहरांचे सर्वेक्षण करून ही यादी प्रसिद्ध केली आहे. या सर्वेक्षणामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 

केंद्र शासनाने 2018 पासून देशातील जगण्यायोग्य शहरांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. देशातील 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे व त्यापेक्षा कमी लोकसंख्या असणार्‍या शहरांचे सर्वेक्षण करण्यात येते. नागरिकांना शहरात उपलब्ध होणार्‍या सुविधा, राहण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण, विकासकामे या सर्वांचा आढावा या सर्वेक्षणामध्ये घेण्यात येतो. देशात बंगळुरु हे राहण्यास एक उत्तम शहर असून त्यानंतर राज्यातील आयटी हब पुण्याला पसंती देण्यात आली आहे. त्यानंतर गुजरातच्या अहमदाबाद शहराला पंसती देण्यात आली असून चेन्नई, सुरत, नवी मुंबई ही शहरे आहेत. या यादीमध्ये मुंबई दहाव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे एमएमआरडीए परिसरातील महानगरपालिकांमध्ये नवी मुंबई पहिल्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई हे सुनियोजित शहर असून मागील 29 वर्षांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने नियोजनबद्धपणे विकासकामे केली आहेत. यामुळे आतापर्यंत महानगरपालिकेला राष्ट्रीय व राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानामध्ये दोन वेळा राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानामध्येही सातत्याने ठसा उमटविला आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. जल व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यासाठीही महानगरपालिकेने पुरस्कार मिळविले आहेत. महानगरपालिकेने मोरबे धरण विकत घेतले असल्यामुळे शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा करणे शक्य होत आहे. प्राथमिक ते उच्च शिक्षणाची सर्वोत्तम सुविधा शहरात उपलब्ध होत आहे. महानगरपालिका व खासगी रुग्णालयांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधाही चांगली असल्यामुळेच नवी मुंबईचा जगण्यायोग्य शहरांमध्ये समावेश झाला आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानामध्येही सातत्याने ठसा उमटविला आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. जल व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यासाठीही महानगरपालिकेने पुरस्कार मिळविले आहेत.  महानगरपालिकेने मोरबे धरण विकत घेतले असल्यामुळे शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा करणे शक्य होत आहे. प्राथमिक ते उच्च शिक्षणाची सर्वोत्तम सुविधा शहरात उपलब्ध होत आहे. महानगरपालिका व खासगी रुग्णालयांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधाही चांगली असल्यामुळेच नवी मुंबईचा जगण्यायोग्य शहरांमध्ये समावेश झाला आहे.