उलवे येथील नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणास प्रारंभ

नवी मुंबई ः सिडको महामंडळाच्या उलवे येथील नागरी आरोग्य केंद्रात बुधवार दि. 31 मार्च 2021 पासून कोविड-19 विरोधी लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी सकाळी 10.00 ते दुपारी 04.00 या वेळेत, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एका सत्रात 50 व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. 

राज्य शासनाच्या निर्देशांनुसार व सिडकोच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून सदर लसीकरण मोहीम सिडकोतर्फे हाती घेण्यात आली आहे. 31 मार्च 2021 पासून उपरोक्त वेळेत आणि दिवशी उलवे येथील नागरी आरोग्य केंद्रात उलवे नोड आणि जवळपासच्या गावांतील नागरिक तसेच सिडको कर्मचार्‍यांना कोविड-19 विरोधी लस देण्यात येणार आहे. तसेच लस दिल्यानंतर काही दुष्परिणाम जाणवल्यास उपचार करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्थाही सदर केंद्रावर करण्यात आली आहे. तरी उलवे नोड व जवळपासच्या गावांतील अधिकाधिक नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.