पालकमंत्र्यांची कोरोना वॉर रूमला भेट
- by Aajchi Navi Mumbai
- May 12, 2021
- 467
पनवेल : पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सोमवार, 10 मे रोजी पनवेल महापालिका प्रशासनाच्या कोरोना वॉर रुमला भेट दिली. त्यानंतर कळंबोली येथील भारतीय कपास निगमच्या गोडाऊनमध्ये होणार्या प्रस्तावित जम्बो कोविड सेंटरची पहाणी केली.
पनवेल महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णसंख्या आणि रुग्णालयांची माहिती नागरिकांना वेळेत मिळावी आणि कोणीही उपचाराविना राहू नये यासाठी महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या कोरोना वॉर रुमला त्यांनी भेट दिली. पालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे सुरू असलेल्या वॉर रुमच्या भेटीवेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून केल्या जाणार्या उपाययोजना आणि नियोजनाविषयीचा आढावा घेतला. यावेळी पालिकेच्या 24 तास बेड उपलब्धीसाठी कार्यरत असणार्या नियंत्रण पथकाद्वारे संबधित रुग्णांना होणार्या त्रासावरुन त्यांना गृह विलगीकरणाची गरज आहे का रुग्णालयात भरती होण्याची गरज आहे आणि असल्यास रुग्णालयाची माहिती रुग्णांना मोबाईलव्दारे देण्यात येते अशी माहिती पालकमंत्री तटकरे यांना पथकाने दिली. खासगी व सरकारी रूग्णालयातरील व्हेंटिलेटर, ऑक्सीजन बेड उपलब्धतेविषयीची माहिती हे पथक देत असते. तसेच प्रत्येक रुग्णालयाची माहिती संकलित करणार्या डॅशबोर्डविषयी माहिती देण्यात आली.
या ठिकाणी आयसीएमआरकडून आलेल्या बाधित रूग्णांची संपूर्ण माहिती नोंद केली जाते. या माहितीवरून रोजच्या रोज बाधित रूग्णांची यादी केली जाते. तसेच कोरोना नियंत्रणासाठी पालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी तटकरे यांना दिली. तसेच शिक्षिकांच्या ट्रेसिंग टिमलाही पालकमंत्री तटकरे यांनी भेट देऊन त्यांच्या कामाचे स्वरूप समजून घेतले. जे रुग्ण गृह विलगीकरणात असतात त्यांच्या समस्या सोडविणे, त्यांना गृह निर्जंतुकीकरण, औषधांची माहिती देणे. तसेच 14 दिवस घराबाहेर न फिरण्याचा सल्लाही ही टिम देत असते. याचबरोबर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी कळंबोली येथील भारतीय कपास निगमच्या गोडाऊनमध्ये होणार्या प्रस्तावित जंबो कोविड सेंटरची पहाणी केली. तेथे सुरू असलेल्या कामाजाची माहिती घेऊन सिडकोला लवकरात लवकर काम पुर्ण करुन महापालिकेला रुग्णालय ताब्यात द्यावे अशा सुचना यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी सिडकोचे सहव्यवस्थापक कैलास शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai