गोरगरीबांंना बिस्किट, सॅनिटायजर व मास्कचे वाटप

पनवेल : कळंबोली येथील सिंग हॉस्पिटल जवळ असलेल्या झोपडपट्टीमध्ये भाजपाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गोरगरीब लोकांना बिस्किट, सॅनिटायजर व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी कळंबोली मंडल अध्यक्ष रवीनाथ पाटील, भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, मंडल सरचिटणीस दिलीप बिस्ट, व्यापारी मोर्चाचे मण्डल अध्यक्ष कमल कोठारी, उत्तर भारतीय मोर्चाचे केशव यादव, डॉक्टर कुरुंद इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

कळंबोली येथील सिडको कार्यालय जवळ असलेल्या झोपडपट्टी पाला मध्ये राहणारे गोरगरीब व भटकंती करणारे मोलमजूर यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. भाजपा भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे यांचा संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यापारी मोर्चाचे कळंबोली मंडल अध्यक्ष कमल कोठारी मंडळ सरचिटणीस दिलीप बीस्ट, भटके-विमुक्त आघाडी कळंबोली मंडळ अध्यक्ष आबासाहेब घुटुकडे उपस्थित होते. माजी खा.रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब जनतेच्या मुखात अन्नाचे चार घास जावेत व कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे.