कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 08, 2021
- 510
पोलीसांचे नागरिकांना आवाहन
नवीन पनवेल : प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात पोलीस स्टेशन हद्दीतील सरपंच, उपसरपंच, राजकीय, कार्यकर्ते, इतर प्रतिष्ठित नागरिकाची बैठक पनवेल तालुका पोलीस ठाणे, मंथन हॉल याठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे (पनवेल) हे उपस्थित होते.
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 33 ग्रामपंचायती येतात. यावेळी सर्व उपस्थित पदाधिकार्यांना नवी मुंबई विमानतळाचे नामकरण हे केंद्राच्या अखत्यारीत असून त्याबाबत आपापल्या गावातील नागरिकांना समजावून सांगावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. इत्यादी महत्वाच्या सूचना एसीपी भागवत सोनावणे यांनी उपस्थितांना दिल्या आणि 29 पदाधिकारींना सी.आर.पी.सी. 149 प्रमाणे प्रतिबंधात्मक नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना विषाणूच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai