ऐरोलीमध्ये मोफत योग प्रशिक्षण सत्र

नवी मुंबई : अंबिका योगाश्रमच्या ऐरोली शाखेच्यावतीने  मोफत योग प्रशिक्षण वर्गाचे 56 वे सत्र 4 जुलै पासुन ज्ञानदीप शाळा,सेक्टर -2, ऐरोली, नवी मुंबई येथे दर रविवारी सकाळी 7 ते 9 दरम्यान संपन्न होत आहे. पु.निकम गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबिका योगाश्रमची स्थापना करण्यात आली असून मुबंई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी आणि रायगड जिह्यात संस्थेच्या सुमारे 40 पेक्षा जास्त शाखा कार्यरत आहेत. अंबिका योगाश्रमच्या शाखेतून दिले जाणारे योगाचे शिक्षण विनामूल्य आहे. सध्याच्या परिस्थितीत योग हा एकमेव पर्याय आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असल्याने योगच्या माध्यमातून शरीर निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.  

 कोरोनाच्या काळात योगाचे महत्व लक्षात घेता अंबिका योगाश्रमच्या ऐरोली शाखेच्यावतीने गत 15 वर्ष अविरत नित्यानंद प्रभु योगचे शिक्षण देत आहेत. योग प्रशिक्षणाचे 56 वे सत्र पूर्ण झाले असून 4 जुलैपासुन दर रविवारी सकाळी 7 ते 9 वाजे दरम्यान या योग प्रशिक्षण सत्राला सुरुवात होत आहे. 

योगच्या माध्यमातून आपले आरोग्य व जीवन आनंदी ठेवण्यासाठी नव्याने सुरू होणार्‍या योग सत्रासाठी आपले नाव नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच नोंदणी न झालेल्यांसाठी 4 जुलै रोजी प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्राच्या ठिकाणी नाव नोंदणी केली जाणार असून जास्तीजास्त नागरिकांनी योग प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन नित्यानंद प्रभु यांनी केले आहे.