नमुंमपा शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरु

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दु व इंग्रजी (स्टेट बोर्ड) च्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी पूर्वप्राथमिक व इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी करीता नि:शुल्क प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

नमुंमपा सी.बी.एस.ई. शाळा क्र. 93 कोपरखैरणे, सेक्टर-14 व नमुंमपा सी.बी.एस.ई. शाळा क्र. 94 नेरूळ, सेक्टर-50 या शाळेमध्ये फक्त नर्सरी वर्गाचे प्रवेश सुरू करण्यात येत आहेत. तरी इच्छूक पालकांनी नर्सरी साठी 3 वर्षे पूर्ण झालेल्या (मानिव दिनांक 31 डिसेंबर, 2021) आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी संबंधित शाळेत जाऊन दिनांक 10 जूलै 2021 पर्यंत अर्ज करावेत. प्रवेशापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दत राबवुन निवड करण्यात येईल.

नवी मुंबई महानगरपालिका शाळांच्या सुसज्ज इमारती असून यामध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. महानगरपालिकेमार्फत विद्यार्थ्यांसाठी विमा योजनेचे संरक्षण  दिले जाते. विद्यार्थ्यांना ईलर्निंग व स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून शिक्षण दिले जात असून सध्यस्थितीत लॉकडाऊनच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. तरी इच्छूक पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश आपल्या नजीकच्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये फॉर्म भरून निश्चित करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.