युपीएससी उमेदवारांना मोफत प्रशिक्षण

नवी मुंबई ः शिवविद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अ‍ॅकेडमीच्यावतीने युपीएससी परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांसाठी राज्यातील एक हजार विद्यार्थ्यांना एक वर्षाचे मोफत शिक्षण दिले जाते. या प्रशिक्षण शिबिरात भारतीय प्रशासकीय सेवेतील आजी माजी मान्यवर मार्गदशन करतात. या वर्षीपासून राज्य शासनाने अशा इच्छुक उमेदवारांसाठी महिना चार हजार रुपये मानधन चालू केले आहे. या प्रशिक्षण शिबिराची प्रवेश परीक्षा 21 जुलै रोजी होणार असून यासाठीची नोंदणी 19 जुलै पर्यंत चालू राहणार आहे. तरी संबंधित उमेदवारांनी ुुुर्.ीींळिरी.लेा या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.