आर.टी.ई. प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 14, 2021
- 473
नवी मुंबई ः आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन 2021-22 ला मुदतवाढ देण्यात आली असून पालकांनी बालकांचे प्रवेश 23 जुलै 2021 पर्यंत निश्चित करायचे आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये तसेच सर्व शासकीय नियमांचे पालन करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संतोष भोसले यांनी केले आहे.
वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इ 1 ली ते 8वी पर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी शासनाकडून दरवर्षी घटकातील बालकांसाठी 25 टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2021-22 ठाणे जिल्हयातील पाच तालुके व सहा मनपातील 07/04/2021 रोजी लॉटरी प्रक्रीया राज्यस्तरावरून पुर्ण करण्यात आली असुन सदर लॉटरीमध्ये ठाणे जिल्ह्यातील अर्जांची निवड झाली आहे. निवड झालेल्या बालकांना संबधित शाळेकडून पालकांनाद्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जाईल, परंतू पालकांनी फक्त मेसेजवर अवलंबून राहू नये. आर.टी.ई.पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा व दिनांक पर्यंत प्रवेशाबाबत कार्यवाही करावी.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai