शिकाऊ उमेदवारांना कॉन्ट्रक्ट रजिस्ट्रेशनविषयी सूचना

आवश्यक कागदपत्रे तत्काळ जमा करण्याचे आवाहन

नवी मुंबई : अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा शिकाऊ उमेवारी योजने अंतर्गत मूलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र पनवेल येथे झालेल्या परिक्षेमधील उमेदवारांना Contract Registration  संबंधित आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत सहायक प्रशिक्षण सल्लागार, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वार औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल जि. रायगड यांनी सूचना केल्या आहेत.

अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 105 वी (एप्रिल 2017), 106 वी (ऑक्टोबर 2017), आणि 107 वी (एप्रिल 2018), शिकाऊ उमेवारी योजने अंतर्गत मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र पनवेल येथे झालेल्या परिक्षांमधील ज्या उमेदवारांचे  Contract Registration Offline  झालेले आहे. अशा उमेदवारांच्या Contract Registration  संबंधातील कागदपत्रांची पुर्तता न झाल्याने  त्यांचे अंतिम प्रमाणपत्र या कार्यालयात उपलब्ध झालेले नाहीत. अशा प्रशिक्षणार्थ्यांनी प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरिता प्रशिक्षणार्थ्यांस दिलेल्या गुणपत्रिका, आस्थापनेकडील Offline Contract Form, आस्थापनेकडील (प्रशिक्षणार्थ्यांना मिळालेल्या  Stipend ची नोंद असणे आवश्यक आहे. संपूर्ण कालावधी) ही कागदपत्रे कार्यालयात स्वत: उपस्थित राहून अथवा आपण ज्या आस्थापनेमध्ये आपले शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केले आहे त्या आस्थापनेशी संपर्क साधुन आस्थापनेमार्फत सर्व कागदपत्रे कार्यालयीन दिवशी जमा करावी, असे आवाहन सहायक प्रशिक्षण सल्लागार, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वार औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल जि. रायगड  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.