Breaking News
पनवेल वार्ताहर : नवेल तालुका परिसरातील पर्यटन केंद्रावर मौजमज्जेसाठी आलेल्या पर्यटकांच्या मोबाईल वर डल्ला मारणार्या दुकलीचा पनवेल तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या दोन आरोपीकडून पोलिसांनी 1 लाख 92 हजार रुपये किमतीचे 16 मोबाईल जप्त केले आहे. हे दोन्ही आरोपी पनवेल तालुज्यातील वावाजे गावातील रहिवाशी आहेत. रमेश रघुनाथ पाटील(वय 32 वर्षे, जितेश भगवान जोगले (वय 24 वर्षे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पनवेल शहरातील वर्षा पाटील या 30 सप्टेंबर रोजी आपल्या कुटुंबासह पनवेल तालुका परिसरातील पर्यटनासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या सर्वांचे मोबाईल एका सॅकबॅगमध्ये ठेवून ती सॅकबॅग ईको कारमध्ये ठेवून गाडी पार्क करून ते कुटंबासह मोहदर नदीकाठी फिरण्यासाठी गेले होते. यावेळी कोणीतरी अज्ञात चोरटयांनी ईको कारचे डिक्कीचे लॉक तोडुन त्यामध्ये ठेवलेले फिर्यादी यांचे मोबाइल चोरी झाले होते. मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याच तक्रार दिली. त्या नुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौंडकर यांनी मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या मार्फतीने माहीती घेवून सखोल तपास करून आरोपीना मंगळवारी वावजे गावातून अटक केली आहे. या आरोपीचा अधिक तपास केला असता 4 मोबाईल व इतर चोरी केलेले 12 मोबाईल असे एकुण 16 मोबाइल एकूण किंमत रु. 1,92,000 चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai