Breaking News
पनवेल ः बनावट सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेऊन त्या सोन्यावर लाखो रुपयांचे कर्ज उकळणार्या टोळी कडून खारघर पोलिसांनी 211.2 तोळे बनावट सोने जप्त केले आहे. खोट्या सोन्याला सोन्याच्या पाण्याची झळाळी देऊन ते सोने खरे असल्याचे भासवून त्यावर ही टोळी हे सोने बँकेत ठेवून कर्ज काढायची त्या पैश्यावर अय्याशी करायची या प्रकरणी खारघर पोलिसांनी या 8 जणांच्या टोळी पैकी 4 आरोपीने अटक केली आहे.
सवोवी वेन्सन मार्टिन वय 45 राहणारा नेरुळ , परशुराम सखाराम देवरूखकर वय 45 राहणार खारघर, भरत शुभसिंग राजावत वय 30 राहणार नेरुळ, सुनील फराटे वय 47 राहणार खारघर असे पकडलेल्या चार आरोपीचे नावे आहे. हे चार आरोपी अन्य फरार असलेल्या चार आरोपीच्या मदतीने, बनावट सोने खरे भासवून बँकेत ठेवायचे आणि त्याच्यावर कर्जाच्या स्वरूपात पैसे उकळत होते. मात्र कामोठे येथील तक्रारदार प्रमोद गर्ग यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. आरोपी पैकी सवोवी मार्टिन हा तक्रारदार गर्ग याचा मित्र होता. मार्टिन याने खारघर येथील ग्रेट बॉम्बे बँक शाखा खारघर येथे तारण म्हणून ठेवलेले सोन्याचे दागिने सोडवून आणल्यानंतर त्या सोन्याची चैकशी केली असता हे सोने बनावट असल्याचे गर्ग यांच्या लक्षात आले. त्या नुसार गर्ग यांनी या घटनेची महिती पोलीसांना दिली आणि पोलिसांनी या बाबत गुन्हा नोंदवून याची तपासणी करण्यास सुरुवात केली. नेरुळ आणि कोपरखैरणे येथील सोन्याचे व्हॅल्यूएशन करुन द्यायचे आणि त्यांच्यातील काही फरार आरोपी मधील आरोपी हा बनावट दागिने बनवून द्यायचा. याच टोळीतील एक मित्र त्याच्या मित्राच्या नावावे बँकेत सोने ठेवून त्यावर कर्ज देखील घ्यायचा. या गुन्ह्यांची उकल झाल्यानंतर खारघर पोलिसांनी या टोळीतील ज्वेलर्स व्यापारी यांना देखील अटक करून त्यांच्याकडून 211.2 तोळे सोने आरोपी कडून जप्त केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai