अधिकारी बनले सल्लागारांचे आधारवड
- by संजयकुमार सुर्वे
- Jun 10, 2022
- 1069
वाशी येथील बस टर्मिनसच्या विकासासाठी मोजले 5.60 कोटींचे सल्लागार शुल्क
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने वाशी सेक्टर 9 येथे बस टर्मिनसच्या भुखंडावर वाणिज्य संकुल विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी पालिकेने मे. द फर्म-मे. नाईट फ्रँक (इं) प्रा.लि.-मे. शांघवी अॅण्ड असोसिएट कन्सल्टंट या सल्लागारांना सदर प्रकल्प विकसीत करण्यासाठी 5.60 कोटी रुपयांचे सल्लागार शुल्क देण्यास मंजुरी दिली आहे. पालिकेने दिलेली मंजुरी ही प्रचलित शुल्कापेक्षा जास्त असल्याने संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाचा तोटा कमी व्हावा म्हणून एसटी महामंडळाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बस आगारांचा वाणिज्यिक विकास करण्यासाठी सप्टेंबर 2008 मध्ये अधिसूचना जारी केली होती. याच धर्तीवर इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या अखत्यारितील बस स्थानकांचा विकास करावा असे आदेश महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966चे कलम 154 अन्वये सर्व महापालिकांना दिले होते. नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची वित्तीय तुट कमी करण्यासाठी बस आगार/बस स्थानकांचा वाणिज्यिक विकास करण्याचा ठराव जुलै 2008 साली सर्वसाधारण सभेने मंजुर केला होता. या मंजुरीच्या अनुषंगाने वाशी सेक्टर 9 येथील बस टर्मिनसच्या भुखंडावर बस स्थानकासह वाणिज्य संकुल विकसीत करण्यासाठी सल्लागाराची नेमणुक करण्याची प्रक्रिया 2017 साली महापालिकेने सुरु केली होती.
तांत्रिक निकष पुर्ण न केल्याने दोनदा पालिकेला फेरनिविदा मागवावी लागली. परंतु तिसर्यावेळी मात्र जे.एल.एल. प्रापर्टी कन्सल्टंट- सोपान प्रभु, मे. द फर्म-नाईट फँ्रक (इं) प्रा.लि. आणि मे. खिलारी इन्फाट्रक्चर प्रा.लि. या तिघांनी निविदा भरली आणि त्यातील खिलारी इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. हे अपात्र ठरले. तांत्रिक मुल्यमापनात मे. द फर्म-नाईट फँ्रक (इं) प्रा.लि. यांना 96 गुण तर जे.एल.एल. प्रापर्टी कन्सल्टंट- सोपान प्रभु यांना 90.5 गुण देण्यात आले. दोन्ही निविदाकारांचे वित्तीय देकार उघडण्यात आल्यावर मे. द फर्म-नाईट फँ्रक (इं) प्रा.लि. यांनी 6.48 कोटी तर जे.एल.एल. प्रापर्टी कन्सल्टंट- सोपान प्रभु यांनी 5.69 कोटी रुपयांची निविदा भरली होती. तांत्रिक व आर्थिक देकारांचे तुलनात्मक मुल्यमापनात मे. द फर्म-नाईट फँ्रक (इं) प्रा.लि. ही वरचढ ठरल्याने त्यांच्याकडून 80 लाखांची सूट घेऊन हे काम मे. द फर्म-नाईट फँ्रक (इं) प्रा.लि.यांना देण्यात आले.
सदर काम हे 120 कोटी रुपयांचे असल्याचे अंदाजपत्रकात नमुद होते. पालिकेने या अंदाजपत्रकावर 4% सल्लागार शुल्क आणि प्रकल्प व्यवस्थापनासाठी 1% याप्रमाणे सदर निविदेस मंजुरी दिली. वास्तविक पाहता, कामाचे अंदाजपत्रक मोठे असल्याने हे काम 2% दरात सहज होणे शक्य होते. परंतु, संबंधित सल्लागारांची पाळेमुळे त्यांच्या राजकीय वरदहस्तामुळे पालिकेत फर्म रोवली असून परिवहन उपक्रमातील अधिकारीच सल्लागारांचे आधारवड बनल्याने 5.60 कोटी अधिक 18% जीएसटीसह हे काम संबंधित सल्लागाराला दिले आहे. परिवहन उपक्रमाच्या या तुघलकी निर्णयामुळे पालिकेचे सूमारे 4 कोटींचे नुकसान झाले असून या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. पालिकेत सध्या विशिष्ट सल्लागारांचीच रेलचेल असून त्यांना 4 टक्के दराने सल्लागार शुल्क देण्याचा पायंडा पडला आहे. अशाचप्रकारे कोट्यावधी रुपयांची उधळण पालिकेने महापालिका मुख्यालय, अग्निशमन केंद्र बांधणे, शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, उद्याने विकसीत करणे यासारख्या कामांवर केली आहे. यासाठी दिलेल्या शुल्कांची मोजदाद केल्यास ती शेकडो कोटींच्या घरात जाईल. त्यामुळे पालिकेत राजकीय वरदहस्ताने काम मिळवणारे विशिष्ट सल्लागार आणि पालिका अधिकारी यांचे साटेलोटे असल्याची चर्चा आहे. सल्लागार शुल्कापोटी कोट्यावधी रुपये मोजत असल्याने पालिका अधिकारीच सल्लागारांचे ‘आधारवड’ बनल्याचे पाहायला मिळत आहे.
- सल्लागारावर वरदहस्त कोणाचा?
मे. द फर्म या सल्लागार कंपनीला गेल्या 8 वर्षात अनेक कामे पालिकेकडून देण्यात आली आहेत. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर भवनाचे सुशोभिकरण सारख्या महत्वाच्या कामांचा समावेश आहे. द फर्म या कंपनीला नवी मुंबईतील मोठ्या राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याने त्याने ‘फर्म’पणे पालिकेत पाय रोवल्याची चर्चा नवी मुंबईत आहे.
- सदर काम हे 131 कोटी रुपयांना देण्यात आले आहे.
- राजकीय वरदहस्ताने काम मिळवणारे विशिष्ट सल्लागार आणि पालिका अधिकारी यांचे साटेलोटे असल्याची चर्चा
- कामाचे अंदाजपत्रक मोठे असल्याने हे काम 2% दरात सहज होणे शक्य होते
सिडकोकडून डिझाईन करावे
- नवी मुंबई महानगरपालिकेने आजतगायत शेकडो कोटी रूपये सल्लागारांच्या शुल्कापोटी अदा केले आहेत. त्यामध्ये रस्त्यांचे बांधकाम, गटारांचे बांधकाम, उद्यान विकसित करणे सारखे शुल्लक कामांचा समावेश आहे.
- सिडकोकडे प्लॅनिंग, डिझायनिंग आणि इमारतींसाठी स्टिलचा वापर निश्चित आराखने बनवणारे स्वतंत्र विभाग आहेत. सिडकोनेच हे शहर विकसित केले असल्याने महापालिकेने विकासकामांचे नियोजन करताना सिडकोच्या विभागांचा अभिप्राय घेऊन प्रकल्प कार्यान्वित केले तर ते प्रकल्प आर्थिकदृष्ट्या परवडणारे शिवाय शुल्क सिडकोलाच द्यावे लागल्याने पैसा शासनाकडेच राहील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे