पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री
- by संजयकुमार सुर्वे
- Jul 01, 2022
- 860
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर फडणवीस उपमुख्यमंत्री
मुंबई ः महाराष्ट्रात आठवडाभर सुरु असलेल्या राजकीय रंगमचावरी सत्तासंघर्षाच्या नाट्याच्या पहिल्या अंकाचा पडदा उघडला असून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने या राजकीय रंगमचावर पुढे काय नाट्य घडणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेला लागली आहे. फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा असताना भाजपने शिवसेनेलाच मुख्यमंत्रीपद देवून संपुर्ण महाराष्ट्राला सुखद धक्का दिला आहे. शिवसेनेलाच मुख्यमंत्रीपद मिळाल्याने गेले 9 दिवस अस्वस्थ असलेल्या शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे.
शिवसेनेत 40 आमदारांनी बंडखोरी करुन महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची अट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातली होती. या बंडाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी करुन भाजपसोबत सरकार बनवण्याची विनंती ठाकरे यांना केली होती. उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना मुंबईत येऊन चर्चा करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान शिंदे यांनी आपलाच गट हीच खरी शिवसेना असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर त्यांनी देऊनही समेट घडू न शकल्याने ठाकरे यांनी 29 जूनला आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु भाजपने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद देऊन सर्वांनाच धक्का दिला आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देऊन त्यांनाही धक्क्याला लावल्याची चर्चा आहे. शिंदे हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री असून शपथविधीनंतर त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अशोक चव्हाण व अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
- व्हीप कोणाचा मानणार?
शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेच्या पक्षप्रतोद पदावरुन सुनील प्रभु यांना हटवून त्यांच्या जागी भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. आता एकनाथ शिंदे यांनी आमचा गट मोठा असल्याने आमचा व्हीप ठाकरे गटातील आमदारांना मानावा लागेल अशी भुमिका घेतली आहे. त्यामुळे कोणत्या गटाचा व्हीप हा कायदेशीर आहे याचा निर्णय नवीन अध्यक्षांच्या हाती आहे. - नाईकांच्या वर्णीकडे लक्ष
राज्यात सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आल्याने मंत्रिमंडळात गणेश नाईक यांची वर्णी लागते काय याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष आहे. परंतु, गणेश नाईक यांना मंत्रिपद देवू नये म्हणून नवी मुंबईतील शिवसेना नेत्यांनी शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. - सरकारपुढील आव्हाने
महाविकास आघाडीने बहुजन समाजाचे आरक्षण घालवले म्हणून राज्यभर गाजावाजा केला. मला सत्ता द्या मी आरक्षण देतो नाहीतर राजकीय संन्यास घेईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्याने त्यांना ओबीसी आरक्षणासह मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा लागणार आहे.जर हा प्रश्न मार्गी लागला तरी त्यांच्या यशात शिवसेना भागीदार ठरणार असल्याने देवेंद्र फडणवीसांच्या भुमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. - भाजपची सावध खेळी
शिवसेनेत बंडखोरी होऊनही भाजपला मुख्यमंत्री करण्यात अपयश आले आहे. बंडखोर आमदारांनी भाजप, प्रहार व मनसे या पक्षात विलीन होण्यास नकार दिल्याने नाईलाजास्तव शिंदे यांना मुख्यमंत्री करणे भाजपला भाग पडले आहे. भाजपने केलेली ही सावध खेळी असून भविष्यात अशाच अनेक धक्कादायक खेळ्या शिंदेसह विरोधकांना पाहावयास मिळणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे