Breaking News
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात सत्तांतर
नवी मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सोळा आमदारांच्या बंडखोरीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सोमवारी निर्णय येणार आहे. मागील सुनावणी दरम्यान सर न्यायाधीश रमण्णा यांनी विचारलेल्या प्रश्नांवरून न्यायालय भूमिका घेणार आहे याचा अंदाज भाजप श्रेष्टींना आल्याने राज्यात शिंदे यांना बाजूला करून फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या दिल्लीत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नाथांचे सरकार अनाथ होणार का? अशा उलट सुलट चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
महाराष्ट्रात गेले महिनाभर सुरू असलेल्या राजकीय गोंधळावरील पडदा आठ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उठण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ शिंदे यांनी घेऊन महिना उलटला तरी त्यांना मंत्रिमंडळ स्थापन करता आलेले नाही. सध्या एक मुख्यमंत्री व दुसरा उपमुख्यमंत्री एवढेच मंत्रीमंडळ राज्यात असून संपूर्ण राज्याचा कारभार या दोघांकडूनच चालवला जात आहे. कधी नव्हे ती महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून त्यास शिंदेसह फडणवीसांची राजकीय महत्वाकांक्षा जबाबदार असल्याने लोकांत प्रचंड असंतोष यासरकार बद्दल आहे. सोळा आमदारांची आमदारकी रद्द करावी म्हणून सेनेने उपसभापती झीरवळ यांना दिलेल्या अर्जावर न्यायालयाच्या स्थगितीने निर्णय प्रलंबित आहे. हा निर्णय प्रलंबित असताना राज्यात सरकार स्थापन केले म्हणून सेनेने दुसरी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. एकंदरीत वेगवेगळ्या तांत्रिक मुद्द्यांवर पाच याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल असून याबाबत एकत्रित निर्णय सोमवारी देणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले आहे. शिवसेनेतच आहोत असे सांगणार्या शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या अर्जावरुन न्यायालयाने निवडणूक आयोगाला ठाकरे गटाला म्हणणे मांडायला मुदतवाढ द्यावी असे सुचवले. त्यामुळे सध्या शिवसेना कोणाची हा प्रश्न मागे पडला असून शिवसेनेतील बंडखोर आमदारांची अपात्रता हा मुद्दा पुढे आला आहे. या मुद्द्यांबाबत सर्वोच्च न्यायालय सोमवारी कोणता निर्णय देते याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नावरून न्यायालयाच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज बांधलेल्या भाजप श्रेष्ठींनी शिंदे यांचे चाळीस आमदार अपात्र ठरले तर फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची चाचपणी सुरु केली आहे. बदलत्या राजकीय परिस्थिबाबत चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना रातोरात दिल्लीत बोलावल्याने राज्यात वेगळ्याच चर्चेला ऊत आला आहे. भाजपाच्या पाठिंब्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या शिंदे सरकारचे आता राजकीय काऊंटडाऊन सुरू झाल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान निवडणूक प्रचारात मी पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री बनतात का? हे पाहणे आता औस्तुक्याचे ठरणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगास ठाकरे यांना म्हणणे मांडण्यास वेळ वाढवून देण्यास सांगितल्याने शिंदेंच्या व्यूहरचनेला धक्का बसला आहे. या सुनावणीनंतर शिंदे यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने शिंदे मानसिकदुष्टया खचल्याची चर्चा
मी पुन्हा येईन?
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai