Breaking News
नवी मुंबई : 1984 मध्ये भूमिपुत्रांच्या लढ्यातील आंदोलनकर्त्यांना तब्बल 38 वर्षांनंतर पोलिसांनी अटक वॉरंट बजावले होते. याप्रकरणी बेलापूर न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र न्यायालयीन सुनावणीवेळी सोमवारी (ता. 23) हे अटक वॉरंट रद्द करण्यात आले.
1984 मध्ये सिडको प्रकल्पग्रस्तांना 12.5 टक्के भूखंड मिळावा, यासाठी भूमिपूत्रांनी आंदोलन केले होते. याप्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यातून 42 आंदोलनकर्त्यांना शनिवारी (ता. 21) अटक वॉरंट बजावण्यात आले होते. त्यानुसार 1984 च्या लढ्यातील आंदोलनकर्ते प्रकाश पाटील आणि विनोद भगवान म्हात्रे, मयत हरिश्चंद्र कृष्णा म्हात्रे यांचे बंधू अजय म्हात्रे आणि हर्षला म्हात्रे पाटील हे बेलापूर न्यायालयात हजर झाले होते. या वेळी ॲड. समित पाटील यांनी न्यायालयात आंदोलनकर्त्यांची बाजू मांडली. कोर्टातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत कोर्टाला सदर अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती केली, आणि त्यांच्या विनंतीचा मान राखत कोर्टाने 42 आंदोलांकर्त्यांसाठी काढलेले दोन्ही अटक वॉरंट रद्द केले, आणि पुढे 13 फेब्रुवारी 2023 ची तारीख देन्यात आली आहे. सदर खटल्याप्रकरणी भूमिपुत्र चळवळीतील वरिष्ठ वकील ऍड एच. बी. पाटील, ऍड अमित पाटील, ऍड समीर पाटील, ऍड सुनील पाटील ह्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, तर ऍड महेश पाटील आणि ऍड कृष्णा पवार ह्यांनी ही सोबत केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai