नवी मुंबईत 14 हजार 838 जणांची गृहस्वप्नपुर्ती

नवी मुंबई ः सिडकोतर्फे सर्वांसाठी घरे धोरणाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी साकारण्यात आलेल्या महागृहनिर्माण योजनेतील 14 हजार 838 परवडणार्‍या घरांची ऑनलाईन संगणकीय सोडत 2 ऑक्टोबर 2018 ला संपन्न झाली. यामध्ये 14 हजार 838 जणांनी आपेल नशीब आजवले असून त्यांची गृहस्वप्नपुर्ती झाली. विजेत्यांना तीन टप्प्यात 2021 पर्यंत घरांचा ताबा मिळणार आहे. 

सोडतीसाठी वापरण्यात आलेले सॉफ्टवेअर ‘मे. प्रॉबिटी सॉफ्ट’ यांच्यामार्फत सिडकोच्या आवश्यकतेनुसार विकसित करण्यात आले होते. संगणकीय सोडत काढताना अर्जदाराच्या अर्जाचा क्रमांक हाच बीज क्रमांक म्हणून गृहित धरण्यात आला होता. सोडत प्रसंगी अनेक भाग्यवान विजेते हजर होते. त्यांचे या प्रसंगी अभिनंदन करण्यात आले. सद्यस्थितीत सर्व सदनिकांचे काम प्रगती पथावर आहे. सदनिकांचा ताबा तीन टप्प्यांत देण्यात येणार असून तो अनुक्रमे ऑक्टोबर 2020, डिसेंबर 2020 व मार्च 2021 असा प्रस्तावित आहे. भविष्यात सोडतीच्या अनुषंगाने काही नवीन सूचना असल्यास त्या ुुु.लळवले.ारहरीरीहींीर.र्सेीं.ळप व हींींिी://श्रेींींशीू.लळवलेळपवळर.लेा या संकेस्थळांवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. जे अर्जदार सोडतीमध्ये यशस्वी ठरतील ते वगळून, उर्वरित अर्जदारांनी भरलेली अनामत रक्कम त्यांच्या अर्जातील नमूद बँक खात्यामध्ये सोडतीच्या दिनांकापासून 15 दिवसांत परस्पर जमा केली जाईल. त्याचप्रमाणे यशस्वी अर्जदारांना सदनिकांसाठी सुलभपणे कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी सिडकोमार्फत येत्या काळात मार्गदर्शकपर बँकींगसंदर्भातील परिसंवादाचे आयोजन करणे प्रस्तावित आहे.

सदर योजनेतील एकूण 14 हजार 838 घरांपैकी 5 हजार 262 सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी     (पान 7 वर)

आहेत. तर 9 हजार 576 सदनिका अल्प उत्पन्न घटकातील नागरिकांसाठी आहेत. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी या 5 नोड्समध्ये 11 ठिकाणी ही गृहनिर्माण योजना साकार होत आहेत.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध सदनिकांचे चटई क्षेत्रफळ 25.81 चौ.मी. आहे तर अल्प उत्पन्न गटांसाठी उपलब्ध सदनिकांचे चटई क्षेत्रफळ 29.82 चौ.मी. आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तळोजा येथे 2 हजार 862 सदनिका, खारघर येथे 684 सदनिका, कळंबोली येथे 324 सदनिका, घणसोली येथे 528 सदनिका व द्रोणागिरी येथे 864 सदनिका उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न घटकांसाठी तळोजा येथे 5 हजार 232, खारघर येथे 1 हजार 260, कळंबोली येथे 582, घणसोली येथे 954 व द्रोणागिरी येथे 1 हजार 548 सदनिका उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज केलेल्या अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना घर प्राप्त झाल्यास एकूण 2.5 लाख रूपयांचे अनुदान मिळणार आहे तर सी.एल.एस.एस. च्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील घर प्राप्त होणार्‍या लाभार्थ्यांना रू. 2.67 लाख व्याज अनुदान प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे सिडकोतर्फे आणखीन 25 हजार घरांच्या गृहनिर्माण योजनेसंदर्भातील निविदा प्रक्रीया सुरू आहे. सदर निविदा प्रक्रीया पूर्ण करून या वर्षाअखेरीपर्यंत ही गृहनिर्माण योजना सिडकोतर्फे जाहीर करणे प्रस्तावित आहे. या गृहनिर्माण योजनेतदेखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प अत्पन्न घटकांसाठी सदनिका उपलब्ध असतील.