Breaking News
उरण ः राज्यातील रक्ताची गरज असलेल्या थँलेसेमिया रुग्णांची रक्ताची अडचण दूर करण्याचा उद्देशाने साई वेताळ ग्रुप, कळंबुसरे यांच्या सौजन्याने आणि समर्पण ब्लड बँक, घाटकोपर यांच्या सहकार्याने “श्री रामनवमी आणि मंडळाच्या 11 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून साईबाबा मंदिर, कळंबुसरे येथे बुधवार दि 17 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत मंडळाचे सलग चौथे विशेष रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
रुग्णांना मदत म्हणून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने या सामाजिक उपक्रमात 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उदघाटन साई मंदिर वहाळचे संस्थापक रविशेठ पाटील आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगड भूषण राजू मुंबईकर यांच्या हस्ते झाले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात साई वेताळ ग्रुप कळंबुसरे अध्यक्ष नंदकुमार पाटील, सदस्य -नरेश पाटील, शैलेश पाटील,स्वप्नील पाटील, शुभम पाटील, रमेश म्हात्रे, प्रभुश्वर म्हात्रे, हर्षद पाटील, रंजित पाटील यांच्या समवेत गोवठणे विकास मंच अध्यक्ष सुनिल वर्तक यांनी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनिल वर्तक, मनीष पाटील यांनी केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai