बंदरात भविष्यात एक कोटी रोजगाराची संधी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 11, 2025
- 73
उरण ः वाढवण व जेएनपीए बंदरात भविष्यात एक कोटी रोजगाराची संधी उपलब्ध होतील असा दावा जेएनपीए बंदराचे अध्यक्ष व वाढवण बंदराचे मुख्य कार्यकारी अधिकारी उन्मेष शरद वाघ यांनी केला आहे. बुधवारी जेएनपीटी एकता कामगार संघटनेच्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
जेएनपीए बंदराचे कामगार विश्वस्त दिनेश पाटील हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी जेएनपीए कामगार एकता संघटनेचा कामगार मेळावा कामगार वसाहती मधील बहुद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी जागतिक बँकेने उत्तमतेच प्रमाणपत्र दिले आहे. सद्या जेएनपीएचा 93 व्या क्रमांकावरून जागतिक पातळीवर 23 वर झेप घेतला आहे. बंदराने राज्यालाआर्थिक स्थान मिळवून दिलं आहे. त्यामुळे पुढील शंभर वर्षात जेएनपीए आणि वाढवण मुळे हे स्थान प्रस्थापित होणार असल्याचे सांगितले. 2020 ते 2025 मध्ये जेएनपीएची आर्थिक सुबत्ता निर्माण झाली. यातून स्थानिक भूमिपुत्रांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न जेएनपीए करील. देशाच आर्थिक हृदय मुंबईला पर्याय म्हणून जेएनपीए निर्माण झालं आता 1 कोटींची कंटेनर हाताळणीची क्षमता पूर्ण झाली आहे. त्यातूनच वाढवण या बंदराचा पर्याय असणारा आहे. 76 हजार कोटींची गुंतवणूक या बंदरात केली जाणार आहे. वाढवण मुळे विस्थापन होणार नाही. पूर स्थिती निर्माण होणार नाही. वाढवण बंदरग्रस्तांना जेएनपीएतील विकास दाखविण्यात आले. मागण्यांसाठी कामगार आंदोलन बंद झाली असा दावा केला. संघर्ष नव्हे सहकार्याची भूमिका घेतली जात आहे. कामासाठी सहकार्य विकास योजना स्थानिकाचा अधिकार बाधीताना शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. क्रिकेट प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल. मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. बंदरातील कामगार 2030 पर्यंत निवृत्त होणार; त्याचप्रमाणे आरोग्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. खाजगीकरनातून दहा हजार नवे रोजगार निर्माण होणार वाढवण बंदरात एक कोटी रोजगार निर्माण होतील असा दावा त्यांनी केला आहे.
यावेळी जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ,मनीषा जाधव,बोरवणकर संजीवन म्हात्रे,जयप्रकाश सावंत जेएनपीए एकता संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील आदीजण उपस्थित होते. यावेळी गायिका कडू खरात गायक राजरत्न यांच्यासह पथकाने स्फूर्ती गीते सादर केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai