सिडकोच्या पाणीदरात वाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 08, 2020
- 603
तूट भरुन काढण्यासाठी 25 रुपयांपर्यंत दरवाढणार
नवी मुंबई : सिडकोने खारघर, कळंबोली, तळोजा, पनवेल आणि कामोठे या नवी मुंबईच्या दक्षिण भागातील पिण्याच्या पाण्याचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अल्प उत्पन्न गटातील निवासी भागांत 20 हजार लीटरपर्यंतच्या पाण्यासाठीची वाढ सव्वा रुपये राहणार आहे, तर उच्च वर्गासाठी ही दरवाढ 25 रुपयांपर्यंत असणार आहे. यामुळे सिडकोची 121 कोटी रुपयांची तूट भरून निघणार आहे.
दक्षिण नवी मुंबईतील खारघर, कळंबोली, तळोजा, पनवेल आणि कामोठे हे नोड सिडकोने पनवेल पालिकेला काही प्रमाणात हस्तांतरित केले असले, तरी पाणीपुरवठासारखी सेवा पालिकेने स्वत:कडे ताब्यात घेतलेली नाही. सिडकोच्या या दक्षिण नवी मुंबई क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी सिडको जलसंपदा विभागाच्या हेटवणे, नवी मुंबई पालिकेच्या मोरबे आणि तळोजा एमआयडीसीतून पाणी विकत घेत आहे.
हेटवणे धरणातून येणारे पाणी सिडको खारघर आणि कामोठे तसेच आता नव्याने विकसित होणार्या उलवा, द्रोणागिरी, नोडला करीत आहे. सिडकोने हे धरण बांधताना जलसंपदा विभागाला वित्त सहकार्य केले होते. त्यामुळे हेटवणे धरणातील पाण्यावर सिडकोचा हक्क आहे. पेण तालुक्यातील या धरणापासून नवी मुंबईदरम्यान येणार्या जलवाहिनीच्या मार्गात अनेक गावे येत असून त्यांनाही पाणी देण्याची जबाबदारी सिडकोची आहे. गेली अनेक वर्षे यात दरवाढ केलेली नाही. मात्र, पाणीपुरवठा आणि पाणीदेयकातून येणारी रक्कम यात तफावत वाढू लागल्याने सिडकोने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यावर संचालक मंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ती लागू केली जाणार आहे.
एमआयडीसी वाढवणार पाणी
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पनवेल महापालिकेला दोन एमएलडी अर्थात 20 लाख लीटर पाणी दररोज वाढवून देण्यात आले आहे. महापालिकेला एमआयडीसीकडून विविध भागात 15 दशलक्ष घनलीटर पाणी देण्यात येत होते. पनवेल महापालिकेला पाणीटंचाई भेडसावत असल्याने जादा पाणी मिळावे, याकरिता पनवेल संघर्ष समितीने पाणी वाढवण्याचे साकडे घातले होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्यांसोबत संघर्ष समितीने घेतलेल्या बैठकीचे फलित म्हणून पनवेल महापालिकेला दोन एमएलडी अर्थात 20 लाख लीटर पाणी दररोज वाढवून देण्यात आले आहे. एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता पी. के. भारती यांनी कडू यांना पत्र पाठवून ही माहिती दिली आहे.
अशी करणार दरवाढ
निवासी क्षेत्रात 20 हजार लीटर पाण्यासाठीचा दर सहा रुपये प्रति क्युबिक मीटर आहे. यापूर्वी हा दर 4 रुपये 75 पैसे होता. टप्प्याटप्प्याने हा दर वाढून 42 हजार लीटर पाण्यासाठी 20 रुपये होणार आहे. वाणिज्य वापराच्या एक हजार लीटर पाण्यासाठी आता 45 रुपये प्रति एक हजार लीटर राहणार आहे. उद्योगधंद्यांसाठी हा दर 18 रुपये आहे. यापूर्वी तो 14 रुपये प्रति हजार लीटर होता. निवासी क्षेत्रातील 25 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या घरांना एक हजार लीटर पाण्यासाठी 85 रुपये दर असेल. यापूर्वी तो 75 रुपये होता. 70 ते 80 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या घरांना 150 रुपये प्रति लीटर दर राहणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai