Breaking News
उरण ः केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था, श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण, श्री साई संस्थान साईनगर वहाळ, डाबर इंडिया कंपनी, जायंटस ग्रुप ऑफ उरण यांच्या संयुक्त विद्यमानाने उरण तालुक्यातील रानसई उरण येथे आदिवासी पाड्यातील गरजू महिलांना शिलाई मशिन तसेच घरगुती साहित्य वाटप करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्या संगीता सचिन ढेरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रानसई येथील 10 गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे येथील आदिवासी पाड्यातील रहिवासी यांना डाबर इंडिया कंपनीचे ज्यूस, शॅम्पू, कोलगेट, गुलाबजाम प्री, आलं लसूण पेस्ट, ग्लुकॉन डी, मसाला यांचे वाटप करण्यात आले. या साहित्य वाटपाचा 325 हुन जास्त आदिवासी बांधवांनी लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी संदीप पतंगे-महाराष्ट्र राज्य अन्न व औषधे असिस्टंट कमिशनर, श्री साई संस्थान साईनगर वहाळ संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण राजू दादा मुंबईकर, आगरी कोळी कराडी समाजाचे उपाध्यक्ष व पनवेल रिटघर येथील माजी सरपंच भरत दादा भोपी, श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्थेच्या व जायंट्स ग्रुप ऑफ उरण च्या अध्यक्ष संगीता सचिन ढेरे, फेडरेशन युनिट डायरेक्टर प्रियवंदा तांबोटकर, माजी अध्यक्ष देवेंद्र पिंपळे, माजी अध्यक्ष ॲड.दक्षता पराडकर, सामाजिक कार्यकर्ता सचिन ढेरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai