महेंद्र चव्हाण ठरला ‘नवी मुंबई महापौर श्री’

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा ः सनिष यादव याने पटकाविला ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ चा बहुमान

नवी मुंबई ः नवी मुंबईत 1996 पासून सातत्याने राज्यस्तरीय व महापालिकास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी आयोजित केलेल्या नवी मुंबई महापौैर श्री राज्यस्तरीय स्पर्धेत पुण्याच्या महेंद्र चव्हाण याने बाजी मारली. तर सनिष यादव याने पटकाविला ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ चा बहुमान पटकाविला. 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय’ आणि ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ खुल्या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयओजन करण्यात आले होते. संपूर्ण राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून 227 शरीरसौष्ठवपट्टू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेत ‘नवी मुंबई महापौर श्री’ राज्यस्तरीय किताब पुण्याच्या महेंद्र चव्हाण या शरीरसौष्ठवपटूने 1 लक्ष 25 हजार पारितोषिक रक्कमेसह पटकाविला. राज्यस्तरीय उपविजेतेपद मुंबईच्या सुशील मुरकर याने 45 हजार रक्कमेसह पटकाविले. ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ पुरस्काराचा मानकरी ठरणार्‍या सनिश यादव यास 50 हजार रक्कमेची पारितोषिक रक्कम स्मृतिचिन्हासह प्रदान करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका स्तरावरील उपविजेतेपद सागर मोरे याने संपादन केले.  

‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय’ स्पर्धेमध्ये पुण्याच्या महेंद्र चव्हाण या 85 किलोवरील वजनी गटातील विजेत्याने सुशिल मुरकर (मुंबई), राजू भडाळे (पुणे), सनिश यादव (नवी मुंबई), तौसिस मोमीन (पुणे), उमेश गुप्ता (मुंबई उपनगर), नितीन म्हात्रे (ठाणे), ओंकार आंबेकर (मुंबई उपनगर) अशा सर्व सातही वजनी गटातील विजेत्यांवर मात करीत नवी मुंबई महापौर श्री किताब पटकाविला. मुंबईचा सुशील मुरकर याने उपविजेतेपदाचा बहुमान संपादन केला. मुंबई उपनगरचा अभिषेक खेडकर ‘बेस्ट पोझर’ तसेच नवी मुंबईचा सनिश यादव हा प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटू’ पारितोषिकाचा मानकरी ठरला.

‘नवी मुंबई महानगरपालिका श्रेत्र श्री’ स्पर्धेमध्ये सनिश यादव हा महानगरपालिका क्षेत्र श्री किताबाचा मानकरी ठरला. सागर मोरे यास उपविजेतेपदाचा बहुमान मिळाला. राज्यस्तरीय स्पर्धेत 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो, 85 किलो व 85 किलोवरील असे आठ वजनी गट होते. या सर्व गटातील सहा विजेत्यांना पारितेषिक रक्कमेसह प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात आली. अशाचप्रकारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शरीरसौष्ठवपटूंसाठी 50 किलो, 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो तसेच 70 किलोवरील 75 किलो वजनी गटातील प्रत्येकी सहा विजेत्यांना प्रशस्तिपत्रासह रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.