फोर्टिस रुग्णालयाकडून पक्षाघात दिनानिमित्ताने जनजागृतीपर कार्यक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 01, 2025
- 45
नवी मुंबई ः देशातील पक्षाघाताच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलने जागतिक पक्षाघात दिनानिमित्ताने जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात उपस्थित तज्ज्ञांनी नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढता पक्षाघाताचा धोका याबाबतीत तपशीलवार माहिती दिली गेली. पक्षाघात टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह पक्षाघाताची लक्षणे यासह पक्षाघातावर तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचे महत्त्वही यावेळी पटवून दिले गेले.
कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी रुग्णालयाच्या नर्सिंग टीमने शैक्षणिक नाट्य सादर केले. नाट्याच्या माध्यमातून 15 मिनिटांच्या कालावधीत पक्षाघाताची प्राथमिक लक्षणे समजावून सांगितली. चेहरा वाकडा होणे, अंधुक दिसणे आणि शारिरीक संतुलन बिघडणे, या बदलांकडे दैनंदिन जीवनात अनेकदा दुर्लक्ष केले जाते. शरीरातील हे बदल पक्षाघाताची लक्षणे असल्याची महत्त्वपूर्ण माहिती नर्सिंग टीमने दिली. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी नियमित औषधांचे सेवन करावे, धूम्रपान आणि अतिमद्यपान टाळावे, असे आवाहन करत निरोगी जीवनशैली आत्मसात करण्याचा सल्लाही दिला. पक्षाघाताचा झटका ओळखणे तसेच आपत्कालीन सेवेचे महत्त्वही विशद केले.
फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलचे न्यूरोलॉजी सल्लागार डॉ. ऋषिक कनन, न्यूरो आणि स्पाईन सर्जरी सल्लागार डॉय समीर काळे आणि न्यूरोलॉजी सल्लागार डॉ. जयेंद्र यादव यांच्याकडून विशेष आरोग्य सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात पक्षाघात ओळखणे आणि आपत्कालीन उपचारांचे महत्त्व समजावण्यात आले. गंभीर परिस्थितीत कोणत्या उपाययोजना कराव्यात, ही माहितीही दिली गेली. पक्षाघात टाळता येतो, हा मुद्दा उपस्थितांना पटवून दिला गेला. पक्षाघाताचे उपचार वेळेवर व्हायला हवेत. आयव्ही थ्रोम्बोलिसिस हे इंजेक्शन देण्यासाठी पक्षाघाताचा झटका आल्यानंतर पहिले साडेचार तास महत्त्वाचे असतात. हा काळ गोल्डन विंडो म्हणून महत्त्वाचा ठरतो ही महत्त्वपूर्ण माहिती समजावण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांना या उपक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी तसेच त्यांचे ज्ञानेंद्रिय आरोग्य सुधारण्यासाठी डॉ. ऋषिक कनन यांनी इंटरएक्टिव्ह मेंदूच्या आरोग्याशी निगडीत उपक्रम दाखवण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसह इतर वयोगटातील उपस्थितांची मेंदूची प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी तसेच समन्वय सुधारण्यासाठी व्यायाम सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
पक्षाघात ओळखणे, टाळणे याकरिता पक्षाघाताविषयी माहिती असणे महत्त्वाचे असते. आजचा जागतिक पक्षाघात दिन कार्यक्रम आमच्या ज्येष्ठ नागरिकांना पक्षाघाताची लक्षणे ओळखणे आणि वैद्यकीय उपचार यांबाबत माहिती देण्याकरिता आयोजित करण्यात आला होता. पक्षाघाताचा झटका आल्यानंतर तातडीने उपाययोजना केल्याने रुग्णाचा जीव वाचेल, ही माहिती देण्यासाठी आम्ही महत्त्वाच्या उपक्रमाचे आयोजन केले होते. - सुविधा संचालक नितीन कामरिया, फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai