आयुक्त गणेश देशमुख यांची बदली

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी अचानक ठाण्यात तडकाफडकी बदली करण्यात आल्याने पनवेलकरांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. 

पनवेल महानगरपालिकेच्या चार वर्षांच्या कार्यकाळात बदली झालेले गणेश देशमुख हे तिसरे आयुक्त. पनवेल महानगरपालिकेचे प्रथम आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचीदेखील तत्कालीन भाजप सरकारने तडकाफडकी बदली केल्याने पनवेलकरांमध्ये नाराजी पसरली होती. त्याच पावलावर पाऊल ठेवत महाविकास आघाडी सरकारनेदेखील पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त देशमुख यांची मुदतपूर्व बदली केल्याने याचे पडसाद पनवेलच्या विकासावर उमटणार आहेत. स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर, यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून देशमुख यांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर पनवेल संघर्ष समिती आदीसह अनेक संघटनांनी ही मागणी रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.