लाच घेण्यात भारताचा क्रमांक पहिला
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 26, 2020
- 1080
नवी दिल्ली ः सरकारी कार्यालयात लाच घेऊन काम करून घेण्यात भारताचा आशिया खंडात पहिला क्रमांक आहे. देशात आपले काम करून घेण्यासाठी कुठल्याही स्वरुपात लाच द्यावी लागते अशी कबुली सर्वेक्षणात सामील झालेल्या नागरिकांनी दिली आहे.
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने बुधवारी एक अहवाल जारी केला आहे. त्यानुसार जपानमध्ये सर्वाधिक कमी लाचखोरी आहे. आशियात भारतनंतर कंबोडिया आणि इंडोनेशियाचा क्रमांक लागतो. लाचखोरीत जरी भारत आघाडीवर असला तरी पुढील काही काळात ही परिस्थिती सुधरेल अशी बहुतांश लोकांना आशा आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 39 टक्के हिंदुस्थानी नागरिकांनी कबुल केले की आपले काम करण्यासाठी लाच द्यावीच लागते. कंबोडियात हा दर 37 तर इंडोनेशियात हा दर 30 टक्के आहे. 2019 मध्ये भ्रष्टाचारमध्ये जगात भारताचा 80 वा क्रमांक होता. ट्रान्सपरसी इंटरनॅशननुसार भारताचा जगात 41 वा क्रमांक आहे तर म्यानमरचा 130वा पाकिस्तानचा 120 क्रमांक असून नेपाळचा 113 वा क्रमांक लागतो.
ट्रान्फरन्सी इंटरनॅशनलने 17 देशांमधील 20 हजार लोकांना काही प्रश्न विचारले. हे सर्वेक्षण जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये घेण्यात आले होते. सर्वेक्षणात सरकारी सेवा देणार्या 6 क्षेत्रांचा समावेश केला गेला होता. सरकारी सेवांमधील भ्रष्टाचारामुळे सर्वाधिक त्रासाला सामोरे जावे लागते असे सर्वेक्षणात दर 4 लोकांमागे तीन लोकांचे म्हणणे आहे. तर तीन लोकांमागे प्रत्येकी एक जण आपला लोकप्रतिनिधी भ्रष्ट असल्याचे मानतो.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai