Breaking News
अमेरिकेत राहण्याचं स्वप्न साकार होणार; ट्रम्प यांना न्यायालयाचा दणका
न्यूयार्क ः अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थानिकांना नोकर्यांमध्ये प्राधान्य देण्यासाठी नियमात केलेले बदल अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळले असल्याने आता अमेरिकेत नोकरी मिळवणं आणि तिथे स्थायिक होणं सुलभ होणार आहे. अमेरिकेत शिक्षण पूर्ण केल्यावर सुरुवातीची नोकरी करू इच्छिणार्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. नोकर्यांसाठी एच-1 बी व्हिसा मिळवण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याचा ट्रम्प सरकारचा प्रस्ताव अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भारतासह अनेक देशांमधल्या नवीन पदवीधरांना अमेरिकेत नोकरी मिळणं सोपं होईल. ट्रम्प यांनी स्थानिक नागरिकांना अधिक संधी देण्यासाठी आपल्या कार्यकाळात एच-1 बी व्हिसा नियमांमध्ये बदल प्रस्तावित केले. ट्रम्प सरकारने निर्णय घेतला होता की फक्त जास्त कौशल्याच्या, जास्त पगाराच्या नोकर्यांसाठीच देशाबाहेरच्या अर्जांना प्राधान्य दिलं जाईल. या नियमाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.
या पार्श्वभूमीवर अमेरिकन व्यापारी समुदाय तक्रार करत होता की नवीन नियमामुळे बाहेरील देशांमधून अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी आलेल्या नवीन पदवीधरांना नियुक्त करणं कठीण होईल. कारण ते नवीन नियमांनुसार अर्ज करू शकणार नाहीत. तिथल्या विद्यापीठांनी सांगितलं की परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर एच-1 बी व्हिसाअंतर्गत नोकर्या मिळणार नाहीत. या परिस्थितीमध्ये त्यांना अभ्यासासाठी बोलावणं कठीण होईल. अर्जाच्या आदेशानुसार एच -1 बी व्हिसा जारी केला जातो. एच 1 बी व्हिसाशी संबंधित नियम बदलण्यासाठी 2020 मध्ये जारी केलेल्या प्रस्तावाविरोधात यूएस चेंबर ऑफ कॉमर्स न्यायालयात गेलं होतं. त्यामुळे या नियमावर तात्पुरती स्थगिती आली. तक्रारीत म्हटलं होतं की नवीन नियम इमिग्रेशन आणि राष्ट्रीयत्व कायद्याचं उल्लंघन करतात. त्या कायद्यानुसार, एच 1 बी व्हिसा अर्जाच्या आदेशाच्या आधारे जारी केले जातात. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय शास्त्रज्ञांसाठी नवे नियम पाळणं कठीण होतं.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News
Aajchi Navi Mumbai