ज्येष्ठ गायक एसपी बालसुब्रमण्यम काळाच्या पडद्याआड
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 25, 2020
- 924
चेन्नई : शुक्रवारी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ गायक एसपी बालसुब्रमण्यम हे काळाच्या पडद्याआड गेले. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यातून ते बरे होत असताना गुरुवारी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज संपली आणि देश आज एक दिग्गज गायकाला मुकला आहे. चैन्नईमधील रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी 1 वाजून 4 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. त्यांचे पुत्र एस.पी. चरण यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली.
बालसुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाचं निदान झालं होतं. 5 ऑगस्टला त्यांना एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आपला व्हिडीओ जारी केला होता आणि आपण बरं असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. मात्र त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. दाक्षिणात्य सिनेमांतील संगितामध्ये त्यांच्या सिंहाचा वाटा होता. जवळपास 40 हजारहून अधिक गीतं गाणार्या एसपीबी यांनी संगीत विश्वात एक मैलाचा दगड प्रस्थापित केला होता. नव्वदचं दशक त्यांनी खर्या अर्थानं आपल्या नावावर केलं होतं. जवळपास 16 भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली होती. कमल हासन आणि सलमान खान या अभिनेत्यांसाठी त्यांचा आवाज प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेला.
1966 मध्ये एसपीबी यांनी तेलुगू चित्रपट ‘श्री श्री श्री मर्यादा रामन्ना’ या चित्रपटातून त्यांच्या गायनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. एमएसवी आणि इलियाराजा यांच्यासोबत काम करताना ऐंशीचं दशकही त्यांनी खर्या अर्थानं गाजवलं होतं. 1981 मध्ये त्यांनी एका दिवसात तब्बल 21 गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांचा हा विक्रम आजतागायत कोणीही मोडलेला नाही. गायनाप्रमाणेच एसपीबी हे त्यांच्या अभिनयासाठीसुद्धा ओळखले गेले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai