अन्य बस सेवांचे एकत्रिकरण करावे

पनवेल प्रवासी संघाची मागणी 

पनवेल ः  राज्यातील प्रवाशांसाठी एसटी बस परिवहन सेवा उपलब्ध आहे. तसेच वेगवेगळ्या प्राधिकरणांच्या हद्दीत के.डी.एम.टी, टीएमटी, एनएमएमटी, के.एन.एम.टी(खोपोली) अशा नावाने बससेवा उपलब्ध आहेत. या सर्व आस्थापनांचे मुंबई महानगर प्राधिकरणाखाली एकत्रिकरण करून मुंबईप्राधिकरणांच्या हद्दीत एकाच बॅनरखाली प्रवासी बस सेवा सुरू करून युनीफॉर्म पद्धतीने एमएमआरडीएने नव्याने चालवाव्यात अशी मागणी पनवेल प्रवासी संघातर्फे केली आहे. 

मुंबई मधील प्रवाशांसाठी बेस्टची प्रवासी बस सेवा उपलब्ध आहे. तशाच सेवा नवी मुंबई, ठाणे, कल्याण, खोपोली या मुंबई महानगर प्राधिकरणांच्या हद्दीत के.डी.एम.टी, टीएमटी, एनएमएमटी, के.एन.एम.टी(खोपोली) अशा नावांने उपलब्ध आहेत. येवढया प्रकारच्या प्रवासी बस सेवा उपलब्ध असून सुद्धा, त्या पाहिजे तितक्या परिणामकारक पद्धतीने चालत नाहीत, शिवाय त्यांच्या आपापसातील स्पर्धांमुळे त्या त्या आस्थापनांचा फायदा न होता आर्थिक नुकसानच होत आहे. यावर शासनाने विचार करून या सर्व आस्थापनांचे मुंबई महानगर प्राधिकरणाखाली एकत्रिकरण करून मुंबईप्राधिकरणांच्या हद्दीत एकाच बॅनरखाली प्रवासी बस सेवा सुरू करून युनीफॉर्म पद्धतीने एमएमआरडीएने नव्याने चालवाव्यात. जेणेकरून या लहान बस सेवांमुळे होणारे शासनाचे व स्थानिक स्वराज्य संस्थेचे देखील आर्थिक नुकसान टाळता येईल आणि विकासाच्या प्रक्रीयेत आर्थिक संतुलन व्यवस्थित सांभाळले जाईल असा आशावाद पनवेल प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ.भक्तिकुमार दवे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की या संबंधात मुख्यमंत्री व परिवहन मंत्री तसेच परिवहन सचिव यांनी या आस्थापनांची एकत्रित बैठक बोलावून या संबंधीचे धोरण तपशील व कार्यवाही सुरू करावी अशी विनंती पनवेल प्रवासी संघातर्फे केली आहे.