महाराष्टात अनेक धार्मिक स्थळे आहेत. देश-विदेशातील नागरिक या स्थळंांना भेट देतात. धार्मिकता हे येथील एक वैशिष्टय. आपापल्या धर्माप्रती श्रध्दा भक्ती सद्भावना व्यक्त करतांना मोठया प्रमाणात तिर्थयात्रा केल्या जातात. यातील मुंबईतील देवींची माहिती पाहणार आहोत.
महालक्ष्मी भुलाभाई देसाई मार्गावर स्थित महालक्ष्मी देवीचे मंदिर मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात तीन मुर्त्या आहेत महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. धाक्जी दादाजी (1760- 1846) ह्या हिंदू व्यापार्याने 1831 मध्ये ह्या मंदिराचा जीर्णोधार केला. महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील प्रसिध्द मंदिर आहे. इ स 1831 ला धाक जी दादाजी नावाच्या एका हिंदू व्यापार्याने या मंदिर पूर्ननिर्माण केले. या मंदिरामागे बराच मोठा इतिहास आहे तो म्हणजे 1785 साली वरळी आणि मलबार हिल या दोन्ही भागांना जोडण्याचे काम इंग्रज इंजिनियर करत होते. पण त्या कामात विघ्न येत होते. त्या प्रोजेक्टचे मुख्य इंजिनियर पाठारे प्रभू यांना वरळी जवळच्या समुद्रात लक्ष्मीच्या मूर्तीचे स्वप्न पडले. त्यांनी स्वप्नात दिसलेल्या जागी त्या मुर्तीचा शोध घेतल्यास त्यांना तिथे लक्ष्मीची मूर्ती सापडली. त्यानंतर त्यांनी तेथेच तिचे मंदिर बांधले. त्यामुळे त्यांचे ते प्रोजेक्ट पूर्ण झाले. हाजी अली दर्गावरुन महालक्ष्मी मंदिर दृष्टीस पडते. हे मंदिर समुद्रा जवळ असल्याने अजून नयनरंम्य वाटते. मंदिराच्या गाभार्यात देवी महालक्ष्मी, देवी महाकाली व देवी महासरस्वती यांच्या मूर्त्या आहेत. या तीनही देवींच्या मुर्त्या स्वयंभू असून त्यांना सोन्याच्या आवरणाने झाकलेले असते. हे मंदिर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत भक्तांसाठी खुले असते. तर नवरात्रीमध्ये सकाळी 6 वाजता देवीची आरती झाल्यानंतर दर्शनास सुरुवात होते ते रात्री 12 पर्यंत भाविक दर्शन घेऊ शकतात. मंदिराला लागूनच हार, फुले, प्रसाद व मिठाईची दुकाने आहेत. नवरात्री मध्ये या मंदिराला फुलांनी सजवले जाते. नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनासाठी खुप मोठी गर्दी उसळते. तसेच येथे जत्रा ही भरते. यंदा कोरोनामुळे यावर बंदी आहे. महालक्ष्मी स्टेशनवरुन शेअर टॅक्सी उपलब्ध आहेत. तसेच बसेस ही आहेत. शेअर टॅक्सी-एका माणसे किमान भाडे 10-15 रुपये. महालक्ष्मी स्टेशनवरुन पायी 15 ते 20 मिनिटात महालक्ष्मी मंदिरात जाता येते.
ग्रामदेवता मुंबादेवी मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे. मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले असल्याचा समज आहे. मुळात मुंबादेवी ही मासे पकडणार्या कोळ्यांची देवता होती. तिचे देऊळ मुंबईच्या सध्या फोर्ट भागात होते. जेव्हा इंग्रजांनी तेथे व्हिक्टोरिया टर्मिनस हे रेल्वे स्टेशन बांधायचे ठरवले तेव्हा बांधकामाला अडथळा ठरलेले ते देऊळ त्यांनी काढून टाकले आणि मुंबईच्या काळबादेवी-भुलेश्वर भागात मुंबादेवीचे सध्याचे मंदिर बांधून दिले. जिच्या नावे या शहराला मुंबई म्हटलं जातं ती मुंबादेवी! साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वी या देवळाची स्थापना आत्ताच्या सी.एस.एम.टी विभागात झाली. इंग्रज सरकारने तिथे स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतल्यानंतर समाजसेवक पांडूशेठ सोनार यांच्या प्रयत्नाने 1737 साली आजचं देऊळ बांधण्यात आलं. मुंबादेवीच्या उजव्या बाजूला अन्नापूर्णा देवीची मूर्ती आहे. प्रामुख्याने कोळी, पाचकळशी समाजातील नवविवाहित जोडपी देवीच्या दर्शनाला येतात. मुंगा या कोळी जातीच्या जमातीवरून या देवीला मुंगादेवी असं म्हणत त्याचाच पुढे अपभ्रंश मुंबादेवी असा झाला. पुराणकथेनुसार मुंबारक या विशालकाय प्राण्याचा संहार करण्यासाठी शंकर आणि विष्णू यांच्या तेजापासून या देवीचा जन्म झाला. मुंबारकाचा संहार केल्यानंतर त्याने देवीची क्षमा मागितली आणि तिचा आशीर्वाद मागितला. तेव्हा देवीने त्याच्या नावारून स्वत:चं मुंबादेवी हे नाव घेतलं.
जीवदानी मंदिर सतराव्या शतकात म्हणजेच सुमारे 350 वर्षांपूर्वी मुंबईपासून 60 किलोमीटर अंतरावर विरार येथे डोंगरावर जीवदान या किल्ल्याचा शोध लागला. तो पांडवांचा असल्याचे मानले जात होते. तेथील एका गुहेमध्ये जीवदानी आई जी आदिशक्तीचे स्वरूप आहे तिचा वास होता अशी मान्यता आहे. जीवदानी देवी हि 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. येथे रोज हजारो भाविक देवीचे दर्शन घ्यायला येतात. हि देवी नवसाला पावते असा या भाविकांचा विश्वास आहे. या मंदिराला 1500 पायर्या आहेत. पायर्या न चढता येणार्यांसाठी रोप वे ची सोय देखील उपलब्ध करून दिलेली आहे. डोंगरावर पोहोचल्यावर थंड वातावरणात थकवा कुठच्या कुठे पळून जातो. तसेच शांत वातावरणात देवीची आराधनाही व्यवस्थित करता येते. नवरात्रीमध्ये तर हे मंदिर विशेष आकर्षण ठरते. मुंबई ला येणार्याने या जीवदानी मातेच्या मंदिराला एकदा भेट नक्की द्यावी.
एकवीरा माता मुंबई-पुणे मार्गावर लोणावळ्यापासून 11 कि.मी अंतरावर कार्ल्याच्या डोंगरावर एकवीरा देवीचे स्थान आहे. श्री परशुरामाची माता रेणुका हीच एकवीरा माता नावाने ओळखली जाते. भारतात रेणुकीची जी जी स्थाने आहेत ती सर्व एकवीरा देवीचीच स्थाने म्हणून ओळखली जातात. विशेष करुन महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात या देवीची पुजा केली जाते. परशुराम हा त्याच्या काळात एकमेव वीर होता. त्यावरुन त्याच्या आईला हे नाव मिळाले असावे. अदितीने तप केल्यावर शंकरानी तिला वर दिला की तुझा अवतार भूतलावर ईक्ष्वाकू वंशातील रेणुराजाच्या घरी होईल. त्यावेळी तुझे मुळ नाव रेणुका असेल. परंतु भूतलावर मात्र तू एकविरा या नावाने विख्यात होशील. तसेच तुला पाच पुत्र होतील म्हणून या श्लोकाधारे असे म्हणता येईल की या देवीला एकविरा हे नाव भगवान शंकरानींच देऊन ठेवले अशी आख्यायिका आहे.
रिपोर्टर
Aajchi Navi Mumbai
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai