Breaking News
नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणवासींची कोकणात जाण्यासाठी असणारी संभाव्य गर्दी, वाहतूक लक्षात घेऊन त्या काळात गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या बंदीनुसार 16 टन व त्यावरील वजनांच्या वाहनांना ही या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी पर्यायी मार्गही निश्चित करण्यात आला आहे.
रविवार, 27 ऑगस्टपासून गोवा मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यासंबंधीचे आदेश वाहतूक शाखा उपायुक्त तिरुपती काकडे यांनी काढले आहेत. गणेशोत्सव संपेपर्यंत हे आदेश लागू असतील. या कालावधीत मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक 66 वर अवजड वाहनांना ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या बदलामध्ये दूध, पेट्रोल, डिझेल, गॅस, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सुविधांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. गोवा मार्गाची दुरवस्था व वाहतूककोंडी यामुळे कोकणवासीयांचा प्रवास नेहमीच त्रासदायक होत असतो. त्यात अनेक वर्षांपासून सुरू असलेले गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai