Breaking News
पनवेल : रविवारी सायंकाळी खारघरमधील सेक्टर 12 येथील उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या एका चार वर्षांच्या बालिकेला उद्यानातील बाकाच्या दूरवस्थेमुळे प्राण गमवावे लागले. ऋक्षा प्रकाश विश्वकर्मा असे या बालिकेचे नाव आहे.
खारघर वसाहतीमधील सेक्टर 12 परिसरातील गिरीराज सोसायटीत ऋक्षा हीचे वडील सूरक्षारक्षकाचे काम करतात. ऋक्षा वडिलांसोबत उद्यानात खेळत होती. तीला दम लागल्याने ती एका बाकावर बसली. ती बसलेले बाक तीच्या अंगावर कलंडून पडल्याने तीचा मृत्यू झाला. कसेबसे वडीलांनी ऋक्षा हीच्या अंगावर पडलेला बाक उचलला परंतू तोपर्यंत तीचा मृत्यू झाला होता. या उद्यानात वाढलेले रान सुद्धा कापण्यात आले नाही. दोन वर्षांपूर्वी माजी नगरसेविका लीना गरड यांचा नगरसेवक निधी संबंधित बाक बसविण्यासाठी वापरण्यात आला होता. या उद्यानात असे चार बाक बसविण्यात आले आहेत.
पालिकेने हे बाक बसविण्याचे काम केले होते. मात्र बाकाच्या दूरवस्थेमुळे खारघरमध्ये एकच खळबळ माजली. तीन दिवसांपूर्वी बालिकेला उद्यानात प्राण गमवावे लागल्याच्या घटनेने खारघरमधील राजकारण तापले आहे. खारघरचा राजा गणेश चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पनवेल पालिकेच्या प्रशासनाने संबंधित उद्यानाची देखभाल करण्याची जबाबदारी असतानाही दुर्लक्ष होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai