पळस्पेवासियांचे उपोषण 9 दिवसांनी मागे
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 31, 2023
- 422
पनवेल : पळस्पे गावाभोवती मोठ मोठे गोदामे आणि गृहप्रकल्पांचे जाळे पसरत आहे. या गोदामांचे सांडपाणी शेतीत घुसल्याने भात शेतीचे मोठे नुकसान होत आहे. भातशेतीचे होणारे नुकसान तसेच होणार त्रास लक्षात घेता ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले होते. आंदोलनाच्या नवव्या दिवशी प्रांत अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून मागण्यावर तोडगा काढण्यात येईल अशी समजूत घातल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
ळस्पे येथील जेडब्लूसी लॉजिस्टिक पार्क,ओशियन गेट कंपनी,टेक केअर कंपनी आणि अरिहंत बिल्डर्स यांच्या कडून शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत.याकरिता दमयंती भगत,शालिनी ठाणगे,सविता घरत,निलेशा भगत,दर्शना बेडेकर,संजय भगत,चंद्रकांत भगत,कमलाकर भगत,नमित बेडेकर आदी ग्रामस्थ पळस्पे हायवे ब्रिज याठिकाणी 11 ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. दि.21 रोजी पुकारलेले आमरण उपोषण दि.29 रोजी 9 व्या दिवशी मागे घेण्यात आले. प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी पुढाकार घेत ग्रामस्थ, गोदाम चालक, गृहप्रकल्पाचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेत या मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. नव्यव्या दिवशी प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी दोन वेळा उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांची समजूत काढत त्यांना उपोषण सोडण्यास सांगितले. यावेळी शेकाप नेते अनिल ढवळे,ऍडव्होकेट सुरेश ठाकुर,इक्बालशेठ काझी देखील सोबत होते. आंदोलनकर्त्यांची शेकाप आमदार जयंत पाटील यांनी देखील भेट घेतली होती. प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी यावेळी सांगितले की पळस्पे वासियांची मागणी रास्त असुन याबाबत आम्ही गोदाम मालक आणि बांधकाम व्यावसायिकांना सुचना केल्या आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai