क्रेडाई-बानमचे 24वे मालमत्ता प्रदर्शन
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2025
- 51
पत्रकार परिषदेत एक्स्पोची घोषणा; 12 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान वाशीत मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन
नवी मुंबई ः 300 हून अधिक प्रतिष्ठित विकसकांचे प्रतिनिधित्व करणारी प्रमुख संस्था नवी मुंबई बिल्डर्स असोसिएशनने 24व्या मेगा प्रापर्टी प्रदर्शनाची घोषणा गुरुवारी केली आहे. नव्याने सुरुवात होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अनुसरुन या वर्षीच्या एक्स्पोची थीम ‘नवी मुंबई: रनवे टू द फ्युचर’ ठेवण्यात आली आहे. या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
क्रेडाई-बानम यांच्यावतीने एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे 24 वा नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पो 2025चे प्रदर्शन 12 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी नवी मुंबई बिल्डर्स असोसिएशनच्यावतीने गुरुवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष वसंत काबरा, सचिव देवांग त्रिवेदी सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 25 डिसेंबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहिले उड्डाण होणार असल्याने नवी मुंबई व एमएमआर क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार असून त्यामुळे या क्षेत्रात रहिवाशी आणि वाणिज्य मालमत्तांना मोठी मागणी निर्माण होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये 50 पेक्षाअधिक नावाजलेल्या विकासकांनी त्यांचा सहभाग दर्शवला असून अनेक बँकांनी ग्राहकांना कर्जसुविधा मिळावी म्हणून अनेक स्टॉल्सची नोंदणी केली आहे. या मालमत्ता प्रदर्शनामध्ये 500 हून अधिक निवासी, व्यावसायिक, टाउनशिप आणि लक्झरी प्रकल्पांची विविधता असणार आहे. यामध्ये 15 लाखांपासून 15 कोटींपर्यंतच्या मालमत्ता एकाच छताखाली नागरिकांना पाहता येणार असून तेथे जागेवर नोंदणी करणाऱ्या ग्राहकांसाठी लकी ड्रा द्वारे खास ऑफर असून दोन भाग्यवान विजेत्यांना प्रत्येकी एक कार बक्षीस देण्यात येणार आहे.
वॉक-टू-वर्क संकल्पनेला चालना देण्यासाठी पुनर्विकास एक महत्त्वाचा विषय ठरत आहे. त्यामुळे एक्स्पो दरम्यान 14 डिसेंबर रोजी हाउसिंग सोसायट्यांसाठी पुनर्विकासविषयक सेमिनार आयोजित केले जाणार आहे. या एक्सोपमध्ये डबल धमाका ऑफर्स असल्याने आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात साकारण्यासाठी या मालमत्ता प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी नागरिकांना केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai