Breaking News
182 घरांसाठी 70 कोटी 20 लाखांच्या खर्चास मंजुरी
नवी मुंबई : तळोजा कारागृहातील कर्मचाऱ्यांरी घरे धोकादायक स्थितीत असल्याने याठिकाणी नवीन 182 घरे बांधून देण्यात येणार आहेत. त्यासाठी 70 कोटी 20 लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मंगळवारी मान्यता देण्यात आली.
शासनाने नवी मुंबईतील तळोजा कारागृह बांधले असून ते 2008 पासून कार्यान्वित केले आहे. मात्र, देखभाल दुरुस्ती अभावी गेल्या 15 वर्षांत या कारागृहासह तेथील कर्मचारी निवासस्थानांची अतिशय दयनिय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तळोजा तुरुंग परिसरात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तीन-चार मजली 16 इमारती बांधल्या आहेत. यातील दोन इमारती जेलर व त्यांच्या कुटुंबीयांसाठी तर उर्वरित 14 ते 15 इमारती पोलिस शिपाई व सुभेदारांसाठी आहेत. तेथे शेकडो पोलिस कुटुंबे राहतात. त्यांना या धोकादायक इमारतींमुळे धोका निर्माण झाला आहे. देखभाल दुरुस्ती अभावी इमारतींचे छत गळत असून, भिंतीतून पाणी पाझरत आहे. त्यामुळे प्लास्टर कोसळण्यासारखे प्रकार घडत आहेत. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कुटुंबीयांसह जीव मुठीत घेऊन कर्मचाऱ्यांना राहावे लागत आहे. यामुळे यावर तोडगा म्हणून आता तळोजा येथे सरासरी 28 चौरस मीटर क्षेत्राच्या 182 नव्या सदनिका बांधण्यात येणार आहेत. 14920 चौरस मीटर क्षेत्राच्या भूखंडावर 41 कोटी 77 लाख 60 हजार रुपये खर्चून त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर पाणीपुरवठा, अग्निशमन सुविधा आणि इतर बाबींवर 49 कोटी 42 लाखावर रक्कम खर्च करण्यात येणार आहे. हा सर्व खर्च 70 कोटी 20 लाखावर आहे.
सध्या महामुंबई क्षेत्रात मुंबईचे ऑर्थर रोड, ठाणे, कल्याणचे आधारवाडी आणि तळोजाही कारागृहे आहेत. मात्र, कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे ती तुडुंब भरली आहे. यामुळे नव्याने उदयास आलेल्या पालघर जिल्ह्यासाठी हक्काचे नवे कारागृह बांधण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. दीड हजार कैदी क्षमतेच्या नव्या कारागृहासह 375 कर्मचारी निवासस्थाने पालघरच्या उमरोळी येथे बांधण्यात येणार आहेत. त्यावर 418 कोटी 82 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. नव्याने उदयास आलेल्या मीरा-भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील कैदी ठेवण्यास त्याची मदत होणार आहे. अहमदनगरच्या पारनेरमध्ये नवीन जेलअहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या नारायणडोह येथेही 500 कैदी क्षमतेच्या कारागृहासह 120 कर्मचारी निवासस्थाने बांधण्यात मान्यता मिळाली असून त्यावर 175 कोटी 90 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai