227 कोटींचा मालमत्ता कर वसूल
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 22, 2023
- 484
पनवेल : महापालिका मालमत्ता कर देयकांच्या वसुलीवरती भर देत असून, चालू आर्थिक वर्षामध्ये महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास पनवेलकरांचा उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. एप्रिल महिन्यापासून ते 21 डिसेंबरपर्यंत 227 कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे. पहिल्यांदाच नऊ महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या रकमेची करवसुली होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सुचनेप्रमाणे महापालिका कार्यक्षेत्रातील उच्चतम थकबाकीदारांना महापालिकेच्यावतीने जप्तीपूर्व नोटीसा देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत आहे. तसेच न्यायालयानेही मालमत्ता कर,वसुलीला स्थगिती दिली नाही. त्यामुळे महापालिका मालमत्ता कराच्या वसुलीवरती भर देत आहे. महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या औद्योगिक, निवासी, वाणिज्य (कमर्शिअल) क्षेत्रातील उच्चतम थकबाकीदारांना त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता अटकावणी संबधीच्या तसेच जप्तीपूर्व नोटीसा देण्यास सुरूवात केली आहे. येत्या काळात जप्ती पूर्व नोटीसा दिलेल्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्या स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. जप्तीपूर्व नोटीसा देण्यासाठी महापालिकेने चार प्रभागांसाठी सहा पथक तयार केले आहेत. यामध्ये खारघरसाठी 1 पथक, कामोठेसाठी 1 पथक, नावडेसाठी 1 पथक, तळोजा एमआयडीसी 1, कळंबोलीमध्ये 1 पथक, पनवेल व नवीन पनवेलसाठी प्रत्येकी 1 पथक तयार करण्यात आली आहेत.
मालमत्ता कर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी पालिकेच्यावतीने पालिका कार्यक्षेत्रात रिक्षातून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा 2 टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढत आहे. याचबरोबर महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच. . या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मालमत्ता कर वसुलीला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. मालमत्ता कर न भरल्यास नागरिकांच्या मालमत्ता हस्तांतरणावरती बंदी येणार आहे. तसेच मालमत्ता कराचा बोजा मालमत्तेवरती चढविला जाणार आहे. याचबरोबर स्थावर व जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकरात आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai