हुश्श... मिळाले एकदाचे ‘खाते'
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 14, 2023
- 655
युध्दात हरले तर तहात जिंकले; खातेवाटपात दादांचाच बोलबाला
मुंबई ः मुंबई ः राज्यात होत असलेल्या सततच्या राजकीय नाट्याने सर्वांनाच संभ्रमात टाकले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. पवारांसोबत 8 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र खाते वाटप झाले नव्हते. त्यामुळे कोणाला कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर शुक्रवारी खातेवाटप जाहीर झाल्याने हुश्श... मिळाले एकदाचे ‘खाते' असा सुस्कारा बंडखोरांनी सोडला असल्याची चर्चा होती.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले. राज्यपाल रमेश बैस यांची स्वाक्षरी झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या परवानगीने खातेवाटप जाहीर केले आहे. मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपासह सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येही फेरबदल करण्यात आले आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्याकडील काही खाती काढण्यात आली आहेत. अजित पवार त्यासाठी दिल्लीलाही गेले होते. अखेर गुरुवारी रात्री तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक पार पडली. त्यानंतर खातेवापटावर शिक्कामोर्तब झाले.
फडणवीसांनी शिंदे यांना फोडून महाविकास आघाडीचे सरकार पाडले परंतु, अजित पवारांनी मुत्सद्दीपणाने पुन्हा सत्ता मिळवली आहे. एवढेच नाही तर शिंदेंच्या बंडखोर आमदारांना मंत्रिपद मिळण्यापुर्वीच दादांनी आपल्या हवी ती खाती पदरात पाडल्याने ते युद्धात हरले तरी तहात जिंकल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे गटाकडून अजित पवार गटाला तीन खाती गेली आहेत.
1. कृषी
2. मदत आणि पुनर्वसन
3. अन्न आणि औषध प्रशासन
भाजपकडून सहा खाती राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत.
1. अर्थ
2. सहकार
3. वैद्यकीय शिक्षण
4. अन्न नागरी पुरवठा
5. क्रीडा
6. महिला आणि बालकल्याण
- छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.
- दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील सहकार.
- राधाकृष्ण विखे-पाटील महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास.
- सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय.
- हसन मियाँलाल मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य.
- चंद्रकांतदादा बच्चू पाटील उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य.
- विजयकुमार कृष्णराव गावित आदिवासी विकास.
- गिरीष दत्तात्रय महाजन ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन.
- गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता.
- दादाजी दगडू भुसे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम).
- संजय दुलिचंद राठोड मृद व जलसंधारण.
- धनंजय पंडितराव मुंडे कृषि.
- सुरेशभाऊ दगडू खाडे कामगार.
- संदीपान आसाराम भुमरे रोजगार हमी योजना व फलोत्पादन.
- उदय रवींद्र सामंत उद्योग.
- प्रा.तानाजी जयवंत सावंत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.
- रवींद्र दत्तात्रय चव्हाण सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून).
- अब्दुल सत्तार अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन.
- दीपक वसंतराव केसरकर शालेय शिक्षण व मराठी भाषा.
- धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम अन्न व औषध प्रशासन.
- अतुल मोरेश्वर सावे गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण.
- शंभूराज शिवाजीराव देसाई राज्य उत्पादन शुल्क.
- कु. अदिती सुनील तटकरे महिला व बालविकास.
- संजय बाबुराव बनसोडे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे.
- मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता.
- अनिल पाटील मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?
खातं वाटप झालं, आता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार असा प्रश्न विचारला जातोय. आपल्याला मंत्रिपद मिळणार अशी रोजच वाट पाहणाऱ्या आमदारांची इच्छा कधी पूर्ण होणार याकडे लक्ष लागलं आहे.
- सवतीचे मीठ अळणी!
वर्षभर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन पदरात मंत्रीपद पडेल या आशेवर असलेल्या शिंदे सेनेतील बंडखोरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मागून येऊन वजनदार खाती राष्ट्रवादीच्या आमदारांना मिळाल्याने सवतीचे मीठ अळणी असल्याची अवस्था शिंदे गटाची झाली आहे. - नवी मुंबईची झोळी रिकामीच
नुकतेच राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. यामध्ये विदर्भ, रायगड, मराठवाडासह इतर जिल्हातील आमदारांना पद देण्यात आली. मात्र नवी मुंबई-पनवेल मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती समजले जाणारे भाजपचे तीन आमदार असूनही एकालाही मंत्रिपद दिले नसल्याने नवी मुंबईची झोळी रिकामीच राहिल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. - राजकीय अपरिहार्य कारणामुळे नवी मुंबईची झोळी रिकामी राहीली असली तरी त्याची कमतरता सिडको संचालकपद नवी मुंबईतील स्थानिक नेत्यांना देऊन भरुन काढण्यात येणार असल्याची चर्चा मंत्रालयात आहे. यापदावर कोणत्या दादा, ताई समर्थकाची वर्णी लागते याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai