
सोमवारपासून 5 टप्प्यांमध्ये अनलॉक
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 05, 2021
- 771
मुंबई : राज्यात अनलॉक वरुन दोन दिवस सुरु असलेल्या चर्चांमुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर शुक्रवारी मध्यरात्री राज्य शासनाने अनलॉक संदर्भातील नियमावली जारी करुन हा संभ्रम दूर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला.
राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री ही नवी नियमावली जारी केली. पाच टप्प्यांत हे अनलॉक होणार आहे. मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर महापालिका हे स्वतंत्र प्रशासकीय युनिट समजण्यात येतील. याचा अर्थ तेथील महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन (ग्रामीण- मुंबई वगळता) या नियमावलीसंदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
असे असणार 5 टप्प्यात अनलॉक
पहिल्या टप्प्यात मोडणार्या ठिकाणी मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल. दुसर्या टप्प्यात मॉल आणि सिनेमा हॉलमध्ये 50 टक्केच उपस्थितीची अट राहील. तिसर्या टप्प्यात दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरु राहतील. सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील. चौथ्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील आणि अन्य दुकाने बंद राहतील. पाचव्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 4 पर्यंतच सुरू राहतील. शनिवार, रविवारी ती बंद असतील.
जिल्हा प्रशासनाची स्वतंत्र नियमावली
3 जून रोजी संपलेल्या आठवड्याच्या सरासरीनुसार भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि पॉझिटिव्हीटी दर या आधारे प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, पण या दोन निकषांच्या आधारे नियमावली कशी असेल हे राज्य शासनाने निश्चित केले आहे. प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करुन नियमावलीनुसार निर्बंध शिथिल वा कडक केले जाणार आहेत. एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत.
5 टक्क्यांपेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्ही 10 ते 20 टक्के पॉझिटीव्हीटी दर असेल आणि 60 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील असा चौथा टप्पा मानला जाईल आणि तेथे सायंकाळी 5 नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार, रविवारी व्यवहार बंद असतील. 20 टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि 75 टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा टप्पा असेल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai